उस्माननगर, माणिक भिसे| मोकलेवाडी ता.लोहा. येथे कारला कट मारल्याचे क्षुलक कारणा वरुण झालेल्या हाणामारीत माणिका मोकले यांना जबर मार लागल्याने उपचारा दरम्यात मृत्यू झाला आहे. फिर्यादी नागेश माणिका मोकले यांचे फिर्यादी वरुण उस्माननगर पोलीस ठाण्यात दहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दि.१० फेब्रुवारी रोजी मोकलेवाडी ता.लोहा येथे माणिका मोकले गावातील हनुमान मंदीराजवळ भंडारा खाण्यासाठी गेले होते. यावेळी बाजुला अचानक आरडा ओरड झाल्याने सोडवण्यासाठी गेले असता आरोपी गंगाधर साहेबराव पारडकर, प्रज्वल संजय पारडकर, विजय साहेबराव पारडकर, यांनी हातातील लोखंडी रॉड, काटी, कोयत्याने, कु-हाडीने मारुण माणिका मोकले, गोविंद, पद्माकर, यांना जखमी केले. शासकिय दवाखान्यात उपचारा दरम्यान माणिका शेषराव मोकले वय ५५ वर्ष यांचा मृत्यू झाला आहे.

नागेश माणिका मोकले यांचे फिर्यादी वरुण गु.र.नं २६/२०२५ कलम १०३,(१) ११८(१) ,११५(२), १८९(२), १९१(३),१९० बी.एन.एस प्रमाणे आरोपी राम दत्ता पारडकर, गंगाधर साहेबराव पारडकर, प्रज्वल संजय पारडकर, विजय साहेबराव पारडकर, प्रसाद रावसाहेब पारडकर,गोविंद शंकर पारडकर, संजय संभाजी पारडकर, चंद्रकांत शंकर पारडकर, साहेबराव संभाजी पारडकर, प्रथमेश संजय पारडकर, रामकिशन शिवबा आकले , सर्व राहणार मोकलेवाडी ता.लोहा. यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा आरोपिंना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी जगताप, आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास स.पो.उ.नि. गाडेकर हे करत आहेत.
