नांदेड| येथील अबचलनगर येथील वयोवृद्ध महिला व इंदरजीतसिंघ कडेवाले यांच्या आई सत्संगी कीर्तनकार श्रीमती गुरचरनकौर स्व. धरमसिंघ कडेवाले यांचे रविवार दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.


शेवटच्या क्षणी त्यांचे वय अंदाजे 83 होते. त्यांच्या पश्च्यात कुटुंबात एक मुलगा आणि सुन, सहा मुली, जवाई, नाटवंड असा मोठा कुटुंब आहे. त्या गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांची चुलती (चाचीजी) होत. स्थानीक सिख समाजात स्व. गुरचरनकौर कडेवाले ह्या सत्संगी कीर्तनकार म्हणून ओळखल्या जात.


त्यांनी चाळीस ते पंचेचाळीस वर्षें महिला समुहात सत्संग कीर्तन केले. गुरुद्वारातून निघणाऱ्या नगरकीर्तन मध्ये त्या समुहासह शबदगायन करायचे. त्यांच्या देहावसाना नंतर समाजातुन शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी संध्याकाळी उशिरा नगीनाघाट शमशानभूमि येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
