किनवट, परमेश्वर पेशवे| रेल्वेच्या धडकेत एका वन्य प्राणी रोहीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 12 जुलै रोजी सकाळी अकरा वाजल्याच्या सुमारास उघडकीस आली आहे सदरील ही घटना 11 जुलै च्या रात्री सहस्त्रकुंड रेल्वे स्टेशनच्या हद्दीतील हरण खरब येथील रेल्वे ट्रॅकवर घडली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.
या घटनेची माहिती रेल्वे ट्रॅकला लागून असलेल्या शेतीतील एका शेतकऱ्याने दिली आहे. या घटनेची माहिती इस्लापूर येथील प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे यांना मिळताच सचिन धनगे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठाला कळवली आणि येथील संबंधित कर्मचाऱ्याला ही माहिती दिल्याने वन कर्मचाऱ्यांनी जाय मोक्यावर जाऊन रेल्वेच्या धडकेत वन्यप्राणी रोहीचे झालेले दोन तुकड्यांचे पंचनामे करून मृत्त झालेल्या रोहीचे दोन्ही अवयव ताब्यात घेतले.
मृत्त रोजची अंतिम क्रिया करण्यासाठी वनरक्षक सय्यद अकबर युसुफ यांनी वन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांची अंतिम क्रिया वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली असल्याची माहिती वनपाल व्ही एस गुद्दे यांनी दिली आहे. यावेळी वनरक्षक सय्यद अकबर इसुफ, वनमजूर लक्ष्मण राजाराम मेटकर, उत्तम श्रीरामे ,लक्ष्मण मागीरवाड, हिराकांत दत्ता शिंदे, राजू गोविंद दूरपडे हे उपस्थित होते.