नांदेड| राज्य सरकारने १० जुलै रोजी विधानसभा व विधान परिषदेच्या सभागृहामध्ये विशेष जनसुरक्षा विधेयक पारित केले असून त्या जनसुरक्षा कायद्यास राज्य भरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात बुधवारी १६ जुलै रोजी हम भारत के लोग मंच च्या वतीने महात्मा गांधी पुतळा येथे एक दिवशीय मौनवृत पाळत आंदोलन करुण जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले.


शहरी नक्षलवाद नष्ट करण्याच्या नावाखाली दलित व डाव्या संघटनाना लक्ष करण्यात येत आहे. फडणवीस सरकारने जनमताचा विचार न करता सदरील काळा कायदा लागू केला असून ही हुकूमशाही कदापी सहन केली जाणार नाही. असा इशारा या वेळी देण्यात आला. यावेळी हम भारत के लोग चे समन्वयक कॉ.विजय गाभणे, श्याम निलंगेकर, कॉ.गंगाधर गायकवाड आदींनी प्रतिक्रिया पर मनोगत व्यक्त केले.


या मौनवृत आंदोलनात दिलेल्या निवेदनावर, कॉ. किशोर पवार,कॉ. उज्वला पडलवार, डॉ.किरण चिद्रावर, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर,कॉ. लता गायकवाड, इंजि.भीमराव धनजकर,मरोतराव देगलूरकर, कॉ. जयराज गायकवाड, कॉ. श्याम सरोदे,कॉ.मंगेश वट्टेवाड,कॉ. दिलीप कंधारे,जयकुमार डोईबळे,मोहन काळेकर, गोविंद पाटील,आकाश चव्हाण, सूरज खिराडे, कैलास भोकरे, संजय नरवाडे,जयदीप पैठने,दिपक पवळे,सम्यक खोसले, दुधारी बहातरे,शेख इमदाद,विलास भुरे,संतोष पतंगे, कॉ. संभाजी सावते, राजू पिसरवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.




