श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर तालुक्यात पावसाने हाहाकार उडाला आहे. काल रात्र ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पैनगंगा नंदी दुथडी वाहत असल्याने वाहतूक सेवा बंद केली त्याच बरोबर नदी पाञातील पाणी अनेक गावात शेतात शिरले आहे.तर तालुक्यातील गाव खेड्यालगत असलेल्या नाल्याचे पाणी अनेक शेतता व घरात शिरल्याने अनेकांच्या संसारउपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. जोरदार झालेल्या पावसाने ग्रामिण गावातील विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे.
माहूर तालुक्यात झालेल्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे.तालुक्यातील अनेक महत्वाची गावे पाण्याखाली गेली आहेत.तर वाई बाजार,उमरा, हरडप,अंजनखेड,नायकवाडीसह अनेक गावखेड्या मध्ये लोकाचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.तर वाई बाजार येथील नाल्याकाटच्या घरात व दुकानात पाणी शिरल्याने या पावसाचा मोठा फटका बसला आहे.येथील फुकट नगर मधील अनेक घरात चार फुटांपेक्षा अधिक पाणी साचले असल्याने संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या लोकांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. पुराचे पाणी गावात शिरल्याने येथील जनजीवन विस्कळित झाले होते. या पावसामुळे मोठे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यात पुन्हा जोरधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढील तीन ते चार दिवस गुजरात किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या चक्रीवादळाने राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. मराठवाड्यातही पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान, आज मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
नांदेड, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यात काल अतिवृष्टी होवून अनेक गावात पाणी शिरले त्यामुळे घराचे आणि शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने परिस्थितीचा आढावा या भागाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर,विधानसभा प्रमुख ज्योतिबादादा खराटे उपजिल्हाप्रमुख अनिल रुणवाल आणि शिवसेना पदाधिकार्याने घेतला आहे.