नांदेड| श्री तुळजा भवानी मंदिर संस्थान तुळजापुर जिल्हा धाराशिव येथे सरळ सेवेने वर्ग 3 व वर्ग 4 मधील विविध पदे भरण्यासाठी आयबीपीएस IBPS कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने दि. 13 व 14 जुलै रोजी तीन सत्रात परीक्षा होणार आहेत. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरीता परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केला आहे.
ही परीक्षा आरजीसी हिटेक डिजिटल झोन नांदेड द्वारा राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युतनगर नांदेड, श्री डिजिटल झोन आयडीझेड विष्णुपुरी एसएस इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट नंबर 18 आणि 22 नांदेड, श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी नांदेड शामल एज्युकेशनल कॅम्पस देऊळगाव रोड नांदला दिग्रस खडकुट या तीन केंद्रावर घेण्यात येणार आहे.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी या परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात दि. 13 व 14 जूलै 2024 रोजी सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंतच्या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच वर दर्शविलेल्या वेळेत, कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., आय.एस.डी, भ्रमणध्वनी, पेजर, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास याद्वारे प्रतिबंध करण्यात येत आहे, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा-2024 परीक्षा रविवार 21 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 या कालावधीत दोन सत्रात खाली जिल्ह्यात 33 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने या 33 परीक्षा केंद्रांच्या परिसरात रविवार 21 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केला आहे.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेशातील यादीमध्ये नमुद 33 परीक्षा केंद्रा पासून 100 मीटरच्या परिसरात रविवार 21 जुलै 2024 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यत च्या कालावधीत, परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच वर दर्शविलेल्या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स/ एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/ फॅक्स/झेरॉक्स/पेजर आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास याद्वारे प्रतिबंध करण्यात येत आहे, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.