हदगाव, शेख चांदपाशा| तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार असून, रुग्णांची कुठल्याही आजारावरील शस्त्रक्रिया व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक्स-रे, सोनोग्राफी, रक्त, लघवी चाचणी, ई.सी.जी. सिटीस्कॅन, एम.आर.आय.इत्यादी चाचण्या मोफत करण्यात येणार असणं, रुग्णास हॉस्पिटलला जाण्याचा खर्च, भरती रुग्णांना खाट शुल्क व जेवण मोफत असणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले आहे.
दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोवा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे तामसा येथे आयोजन बाबुराव कदम कोहळीकर (जिल्हाप्रमुख शिवसेना, नांदेड) यांच्या वतीने रविवार ०४-ऑगस्ट -२०२४ रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबीरात पुढील आजाराची तपासणी व उपचार केल्या जाईल मेडिसीन तज्ञ रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाचा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, जुनाट हृदयरोग, छातीत दुखणे, धाप लागणे, छातीत धडधड करणे इत्यादी. नेत्ररोग तज्ञ : डोळ्यांचे सर्व आजार, मोतियाबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा इत्यादी, सर्जरी तज्ञ : हायड्रोसिल, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्याचे आजार, मुतखड्याचे आजार, पोटाचे आजार, गलगंड (थायरॉईड) इत्यादी, स्त्रीरोग तज्ञ : मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, महिलांचे आजार इत्यादी, बालरोग तज्ञ : हृदयाला छिद्र असणे, मतिमंद, मुलांच्या विकासासंबंधी आजार तसेच कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार, कान नाक घसा तज्ञ कान नाक घश्याचे सर्व आजार. अस्थिरोग तज्ञ संधिवात, मणक्यात असणारी गॅप, वाकलेले पाय, फॅक्चर तसेच हाडांचे सर्व आजार, त्वचारोग तज्ञ: खाज, गचकरण, अंगावरील पांढरे डाग, त्वचेचे विविध आजार.
शिबीर स्थळावर नोंदणी मोफत. तज्ञ डॉक्टरांकडून निःशुल्क तपासणी मोफत. भरती रुग्णांना सर्व सामान्य चाचण्या उदा. (एक्स-रे, रक्त, लघवी चाचणी, सोनोग्राफी) मोफत. महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली जाईल. अतिविशिष्ट चाचण्या (सि.टी. स्कॅन, एम. आर, आय इत्यादी चाचण्या) आवश्यकतेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत. डॉक्टरांच्या सल्यानुसार इ. सी. जी तपासणी मोफत केल्या जाईल. भरती रुग्णांना खाट शुल्क, जेवण मोफत. रुग्णाचा आजार कुठल्याही सरकारी योजनेत येत असल्यास, सरकारी योजनेला प्राधान्य देण्यात येईल. रुग्णाचा आजार महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास उपचार मोफत करण्यात येईल. या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरचे निदान व संदर्भ सेवा देण्यात येईल. फाटलेले ओठ, दुभंगलेला टाळू (जांभाडा) तसेच जन्मतः असलेल्या मुखविकृतीवर शस्रक्रिया मोफत. गुडघे व कंबरेच्या सांध्याचे प्रत्र्यारोपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास मोफत. आणि भरती रुगांना हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता वाहनांची व्यवस्था मोफत राहील. शिबिरामध्ये येताना रुग्णांनी आधार कार्ड व राशन कार्ड सोचत आणावे आणि शिबिरात येताना रुग्णांनी राशन कार्ड वर नाव असेल्या सगळ्या लोकांचे ओरिजनल आधार कार्ड हे महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत उपचार घेण्यासाठी मोचत आणावे. लागेल असेही प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.
यापूर्वी हदगाव व हिमायतनगर येथे घेतलेल्या शिबिरातील शेकडो रुग्णांची मोफत तपासणी व मोठ मोठ्या शस्त्रक्रिया करून आणल्यानंतर प्रथमच तामसा शहरांमध्ये मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर होणार आहे. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी केले आहे.