नविन नांदेड l महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे संस्थापक मूख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, महिलांचे लाडके भाऊ म्हणून परिचीत असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभावे यासाठी शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी प्रदेशाध्यक्ष तथा अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जाचे बाळासाहेब किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने व त्यांच्या टिम च्या वतीने दि ९ फेब्रुवारी रोजी जवाहरनगर येथिल प्राथमिक अरोग्य केंद्र येथे शेकडो गरोदर महिला सह रूग्णांना केळी व सफरचंद वाटप तर प्राथमिक अरोग्य केंद्र येथे वृक्षारोपण करण्यात आले.


व धनगरवाडी येथिल लहुजी साळवे निराधार निराश्रीत बालकाश्रम आनाथ निराधार विद्यार्थी यांना अन्नदान करून विद्यार्थी यांना शालेय साहित्य शैक्षणिक परिक्षाचे प्याड व पेन देऊन अनाथ निराधारांना आश्रय देऊन आधार देण्याचे काम करण्यात आले . शिवसेना ओबीसी व्हिजे एनटी चे नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने यांच्या वतीने व सर्व शिवसेना ओबीसी व्हिजे एनटी टिम च्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त वरील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी संजय सोनकांबळे, हर्षराज सोनवणे ,गणेश जिंदम , नांदेड दक्षिण अध्यक्ष देवराव पांचाळ उपाध्यक्ष बालाजी आचमे,विजय पांचाळ, सचिव शिवाजी भारती सह सचिव आशोक दर्शने,बळीरामपूर सर्कल प्रमुख चंद्रकांत मॅनेटवार , विष्णूपूरी गण प्रमुख दत्ता पातरपल्ले,खूपसरवाडी शाखा प्रमूख भिमाशंकर मंडले,शेख खाजा आली शेख आखील सिराज ,शेख अमर परमेश्वर मंडले, हनमंत मंडले उपस्थित होते.

तुप्पा जवाहर नगर येथिल प्राथमिक अरोग्य केंद्र येथिल वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुडपे ,आरोग्य सहाय्यक इंदुरकर वाय.आर, तेलंग एम. व्ही. आरोग्य सहायीका श्रीमती पवार सी. आर,मीना कांबळे, आरोग्य सेविका श्रीमती पाठक ए.एस, आधी परिचारिका श्रीमती मंगल मनेबैनवाड सिस्टर , परिचारिका रेखा पोटे ,भिमा वाघमारे मॅडम,विमल मेथेकर ,अशोक कंदारे या सह प्राथमिक अरोग्य केंद्र येथिल कर्मच्यारी यांनी या कार्यक्रमास सहकार्य केले

लहूजी साळवे निराधार निराश्रीत बालकाश्रम धनगरवाडी येथिल सर्व कर्मचारी शुभांगी सोनटक्के,प्रतिभा जाधव, पार्वती डोम्पल्ले आदीनी या कार्यक्रमा प्रसंगी सहयोग केला तर यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या वतीने धनगरवाडी येथिल साईबाबा मंदीर येथे साईबाबाचे दर्शन घेऊन एकनाथ राव शिंदे यांना दिर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली.