नांदेड। नांदेड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी प्रणित काॅग्रेसचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या विजयाचा नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक २ तरोडा (बु.) मध्ये काॅग्रेसचे युवानेते महेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतीषबाजीसह एकमेकांना पेढे भरवून महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव व जल्लोष साजरा केला.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी प्रणित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांचा विजय झाल्याने त्यासाठी मोठे मताधिक्य देऊन महत्वपूर्ण योगदान असलेल्या तरोड्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मूळ गांव तरोडा (बु.),चैतन्यनगर व अनेक उपनगरांमध्ये आनंदोत्सव साजरा केल्या.
यावेळी काॅग्रेसचे युवानेते माणिक देशमुख, राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना जिल्हा समन्वयक बळवंत तेलंग,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख बंडू देशमुख,वसंत पाटील, पप्पु देशमुख,सुरज सोनेकर,गंगाधर देशमुख, संजय वाघमारे,मारोती घोडके,शेख असलम, शेख युनुस,ईलियास,जावेदभाई आदींसह शेकडो महिला,युवक व महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते या आनंदोत्सवामध्ये सहभागी झाले होते.
अनेकांच्या निवासस्थानीही जल्लोष !
दरम्यान,नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण व हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर या दोघांच्याही विजयाचा आनंदोत्सव येथिल काॅग्रेसचे महेश देशमुख,माणिक देशमुख,आ.माधवराव पाटील जवळगावकर मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे व राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव मा. भवरे आदी महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपल्या निवासस्थानीही फटाक्यांची आतीषबाजी,विद्युत रोषणाईसह पेढे वाटून आनंद व जल्लोष साजरा केला.