नांदेड| नांदेडच्या महात्मा फुले हायस्कूल, बाबा नगर येथील एनसीसी कॅडेट्सनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त स्वच्छता जनजागृती रॅली काढली. ध्वजारोहण सोहळ्यानंतर सुरू झालेली ही रॅली महात्मा फुले शाळेपासून बाबा नगर आणि आनंद नगर परिसरात गेली. या रॅलीद्वारे नागरिकांना स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
एनसीसी छात्र सैनिकांनी स्वच्छते विषयक घोषणा देत परिसरातील लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण केली. आनंद नगर आणि बाबा नगर परिसरातील नागरिकांनी या रॅलीचे मोठ्या उत्साहात कौतुक केले.
रॅली आयोजित करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांनी परवानगी दिली, तर एनसीसी सेकंड ऑफिसर दत्ता बारसे, आर्मी विंगचे थर्ड ऑफिसर पी. एस. केंद्रे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दुगाळे, पर्यवेक्षक ए. आर. कल्याणकर, पर्यवेक्षिका महाराज मॅडम, शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. राम वाघमारे, दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे आणि इतर शिक्षकवर्ग यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.