नांदेड। खुन व मोक्का गुन्हयातील दिड वर्षापासुन फरारी आरोपीचा शोध घेवुन नांदेड गुन्हे शोध पथकाच्या पोलीसांनी अटक केली आहे, या कार्यवाहिबद्दल अभिनंदन केले जाते आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, यांनी पाहिजे, फरारी आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याचा आदेशीत केल्याप्रमाणे उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील व पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक वजिराबाद अधिकारी सपोनि. राजु वटाणे, पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकॉ चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, रमेश सुर्यवशी, बालाजी कदम असे दोन्ही पथक मिळुन पोलीस उप विभाग इतवारा व नांदेड शहर हदीत पाहिजे फरारी मधिल आरोपी शोध घेत असताना दोन्ही पथकांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीलायक माहिती मिळाली की पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण हदीत खुन गुन्हयातील एक आरोपी धनेगाव नवीन पुल खाली थांबलेला आहे अशी माहिती मिळाली. मिळालेली माहिती वरिष्ठांना देवुन त्यांचे सुचनेप्रमाणे सदर पथक माहितीच्या ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेऊन नाव गाव विचारले असता त्याने त्याचा नाव किरण सुरेश मोरे वय 28 वर्ष व्यवसाय बेकार रा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, धनेगाव नांदेड असे सांगितले.
त्यास विचारपुस केले असता त्याने त्याचे ईतर साथीदारांच्या मदतीने दिड वर्षापुर्वी नाईक कॉलेज सिडको समोर खुन केलेल्या गुन्हयात मी फरार आहे असे सांगितले. पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण गुरन 122/2023 कलम 302,386,120 (ब), 143,147,148, 149, 323 भादवी सह कलम 3,4,25,27 शस्त्र अधिनियम सह कलम 135 मपोका सह कलम 3 (1), (ii),3 (2), 3(4) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम मधील पुढील तपासकामी नांदेड ग्रामिण पोलीस स्टेशनला हजर केले आहे. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग नांदेड शहर श्रीमती. सी.एम. कीर्तीका हे करीत आहेत.
सदर कार्यवाही बाबत मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, मा.श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, सुशिलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी उप विभाग इतवारा नांदेड असे वरिष्ठांनी गुन्हे शोध पथक उपविभाग इतवारा यांचे कौतुक केले आहे.