नांदेड| नांदेड शहरात अनेक ठिकाणी रोड वर मोठ मोठे खडे पडले आहेत अतिशय रहदारीच ठिकाण असलेल यशवंत कॉलेज ते भाग्यनगर या रोडवर हजारो विद्यार्थी ये जा करत असतात या परिसरातील मुख्य रस्त्यावर मागील अनेक महिन्यांपासून मोठ मोठे खडे पडले होते.


त्यात पावसाळा सुरू झाल्यामुळे सध्या नांदेड शहरात अनेक ठिकाणी रोड वरील खड्डे बुजविण्याचे काम केले जात असून त्या खड्यात कोरडी खडी टाकून तात्पुरते समाधान केले जात आहे. कोरडी खडी आणून टाकल्या मुळे गाडीच्या टायरने खडी उडून लागणे किंवा टू व्हीलर घसरणे असे प्रकार रोज घडत आहेत.


खडी मुळे गाडी घसरून किरकोळ तसेच गंभीर अपघात होत आहेत स्थानिक प्रशासनाने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. आणि खडी सोबत थोडाफार मुरूम त्या खड्ड्यामध्ये टाकला तर समस्येवर समस्या तयार न होता उपाय होईल अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.




