नांदेड| शहर व परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील काहीजण नांदेड पाटी जवळ, श्रावस्तीनगर, नांदेड येथे थांबल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून तिघांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ लक्ष 37 हजारांचे मोबाईल जप्त केले आहेत.
दिनांक 06/10/2024 रोजी साईनाथ पुयड, पोलीस उप निरीक्षक, स्था. गु. शा., नांदेड यांचे टिमने नांदेड शहरात व परिसरात चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेतला असता संशयीतरित्या फिरणारे इसम नामे 1) गुलाब पिता राजु प्रधाण वय 25 वर्ष व्यवसाय बांधकाम मजुरी रा. डॉ. आंबेडकरनगर, नांदेड, २) अमोल ऊर्फ अम्या पिता राजु खंदारे वय 18 वर्ष व्यवसाय मजुरी रा. विष्णुनगर, खोबागडेनगर नं. ०२ नांदेड आणि 3) शिवा ऊर्फ शिवम पिता जालींदर धवणे वय 24 वर्ष व्यवसाय बेकार रा. तेहरानगर, नांदेड यांना ताब्यात घेवुन, त्यांचे ताब्यातुन एकुण 19 मोबाईल रु. 2,37,000/- किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
जप्त करण्यात आलेल्या मोबाईलचे मालकी हक्का बाबत व मोबाईलचे खरेदी बिला बाबत त्यांना विचारपुस केली असता त्यांचेकडे एकाही मोबाईलची पावती मिळुन आली नाही. तसेच त्या मोबाईल बाबत त्यांनी समाधान कारक उत्तर दिले नाही. म्हणुन पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे त्यांचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन, पुढील तपास करणे कामी पो. स्टे. ला हजर केले अशी स्थानिक गुन्हे शाखेने उत्कृष्ट कामगीरी केली आहे.
हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, साईनाथ पुपड, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, किशन मुळे, संतोष बेल्लुरोड, विलास कदम, गणेश धुमाळ, बालाजी कदम, राजु डोंगरे, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी हि कार्यवाही केली आहे.