श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालुक्यातील रुई येथे भावकीच्या शेती वादातून पोलीस पाटलांच्या घरी बैठक बसविण्यात आली होती बैठकीत तोडगा न निघाल्याने मोठ्या भावाने चुलत भावाला गावकऱ्यासमोर विळ्याने वार करून मयत परवेज पंटूस देशमुख वय २१ वर्ष यास ठार केल्याची घटना दि १८ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
मयताचे वडील पंटुष शेरू साहेब देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दि.१८ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आरोपी पुतण्या साहील बबलु देशमुख याचा शेतीसंबंधी वाद असल्याने पोलीस पाटील परसराम भोयर यांचे घरी बैठक ठेवली होती. त्यावेळी तेथे मुलगा परवेज पत्नी साजराबी. पुतण्या पप्पू मीरसाहेब देशमुख, साहिल बबलू देशमुख, सोहेब बबलु देशमुख, भावजय फिरोजा देशमुख ,जावाई शे,इंरशाद तसेच सरपंच बाईचे पती गणेश राउत, पोलीस पाटिल परसराम भोयर, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तमराव सुकळकर हे हजर होते. शेतीसंबंधी वाद असल्याने चर्चा झाली.
त्यामध्ये पुतण्या साहील बबलू देशमुख हा म्हणाला की, आमची जमीन कोठे आहे. आम्हाला तुम्ही अडीच एकर जमीन दया त्यावेळी मी माझ्या पुतण्यास सांगीतले की, तुमची जमीन तुमचे वडील बबलू देशमुख यांनी पुर्वीच विकली आहे. वाद मिटला बैठकीतील प्रतिष्ठीत लोकांनी यापुढे जमीणीचे कारनावरुन भांडण तंटे करु नका असे सांगीतल्यानंतर घरी जण्याकरीता निघाले असता पुतण्याने माझा मुलगा मयत परवेज यास पाठीमागून पकडले. आरोपी साहील बबलु देशमुख याने विळ्याने वार केल्याने परवेज हा ठार झाला. यावरून मयताचे वडील पंटुस देशमुख यांच्या फिर्यादीवरून माहुर पोलिसात आरोपी साहील बबलू देशमुख, सोहेब बबलु देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास सपोनी शिवप्रकाश मुळे हे करीत आहेत.