नांदेड| येथे उत्तर भारतीय बांधवांनी हजारोंच्या संख्येत गोदावरी किनारी एकत्र येऊन छठपूजा महापर्व मोठ्या भक्तीभावाने साजरा केला. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते आरतीला प्रारंभ झाल्यानंतर तीन दिवसांचा कठोर उपवास सोडत महिलांनी नदीकाठावरून उदय होत असलेल्या सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले.


या प्रसंगी दिलीप ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “नांदेडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात छठ सण साजरा होतो, हे पाहून आनंद आणि अभिमान वाटतो. तीन दिवस पाण्याचा घोट न घेता उपवास करणाऱ्या मातृशक्तीचे हे अद्भुत उदाहरण आहे.प्राकृतिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेडतर्फे गेल्या १५ वर्षांपासून हा सण भव्यदिव्य पद्धतीने साजरा केला जात आहे याबाबत सर्वांचे मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे.


बंदा घाट येथे सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी पहाटे दोन सत्रात हजारो भाविक उपस्थित होते.महिलांनी मंगळवारी पहाटेपासून गुडघ्यापर्यंत पाण्यात उतरून सूर्यउदयानंतर अर्घ्य अर्पण करून व्रताची समाप्ती केली. फटाक्यांच्या आतषबाजीने वातावरण दुमदुमून गेले. त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.



संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष शिवशंकर प्रसाद, उपाध्यक्ष एस. के. झा, सचिव मनोज ठाकूर व कोषाध्यक्ष रामप्यारे शर्मा यांनी उपवास करणाऱ्या महिलांचा सत्कार केला. संध्याकाळच्या सत्रात प्रमुख अतिथी म्हणून म्हणून लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल, भाजपाचे अरविंद भारतीया व मुन्नासिंग तेहरा, लायन्स रीजनल सेक्रेटरी गंगाबिषण कांकर, युवा व्याख्याता शांभवी साले, माजी नगरसेविका जयश्री ठाकूर, अमृता जायस्वाल, संध्या छापरवाल, हुकूमसिंग गहलोत आदी मान्यवर उपस्थित होते.


महापालिकेच्या वतीने सुभाष कुकडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक जीव रक्षकांनी दक्षता घेत सुरक्षिततेची काळजी घेतली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजीव जिंदल, सचिन मित्तल, अशोककुमार दास, मनोजकुमार सिंह, संजय त्रिपाठी, प्रेमजी पागल पानवाले, जितेंद्र निषाद, हरेराम साहा, रजनीश दुबे, यांनी परिश्रम घेतले. पहाटे चार वाजल्यापासून अमित रंजन झा, विनय शर्मा, ब्रजराज झा, नवलकुमार, गोपालप्रसाद सिंह, अजितकुमार सिंह, शैलेंद्र निगम, राजेश विश्वकर्मा, शिवा यादव, राधेश्याम विश्वकर्मा, दिनेश शर्मा, उमेश विश्वकर्मा, रामजीत सहानी, सुनील मिश्रा, महेश विश्वकर्मा, छोटू पाल, कार्तिक विश्वकर्मा, चंदन कुमार व मुकेश अग्रवाल यांनी गोदाकाठी उपस्थित राहून महाप्रसाद वाटप केले.
बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड व पश्चिम बंगाल येथून आलेले व नांदेड जिल्ह्यात कार्यरत असलेले हजारो उत्तर भारतीय बांधव या सोहळ्यात सहभागी झाले. गोदावरी तीरीचा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नांदेडकर उपस्थित होते.


