नांदेड| दि.18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत हृदय रोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्याच्या हेतूने तसेच हृदय रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी दत्तकृपा EECP सेंटर चिन्नावार लॅबच्या खाली डॉक्टर्स लेन येथे 3D Vasulography ( Cartography ) तपासणी मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येणार आहे. या तपासणी द्वारे हृदयाचा रक्तपुरवठा,हृदयाच्या रक्त वाहिनीमध्ये किती प्रमाणात आणि कोठे अडथळे तयार झालेत, हृदयाची पंपिंग ही माहिती समजते.
सध्या ही तपासणी पुणे, मुंबई सारख्या मोठया शहरांतच उपलब्ध आहे. तिथे लागणाऱ्या खर्चा पेक्षा सवलतीच्या दरात ही तपासणी करण्यात येणार आहे.या तपासणी द्वारे भविष्यात होणारा हार्ट अटॅक वेळीच काळजी घेऊन टाळता येऊ शकतो.
ज्यांना पूर्वी अंजिओप्लास्टि, बायपास शस्त्रक्रिया झाली आहे किंवा ज्यांना हृदय विकाराचा झटका येऊन गेला आहे, किंवा ज्यांना मद्यपान, धूम्रपान, तंभाखू अशी व्यसणे आहेत, जे अति ताण -तणावात काम करतात, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तात अति कोलेसस्टे्रोल या समस्या आहेत त्या सर्व 30 वर्षा वरील तरुणांनी व हृदय रुगणांनी ही तपासणी आवर्जून करावी असे आवाहन दत्तकृपा EECP, सेंटर चे संचालक डॉ विलास धर्माधिकारी यांनी केले आहे. वेळीच काळजी घेतल्यास पुन्हा पुन्हा होणाऱ्या हृदयरोगापासून दूर राहणे आता शक्य आहे..