छत्रपती संभाजीनगर | आदर्श शिक्षक सावित्रीबाई सन्मान पुरस्कार सोहळा दि.5/9/2024 रोजी तेजस्विनी इंग्रजी शाळा शिवराणा वाचनालय पुंडलिकनगर, छत्रपती संभाजीनगर येथे सायंकाळी 4 वाजता थाटात संपन्न झाला. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी हदगाव येथील शिक्षक बालाजी व्यंकटराव सादूलवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२४ साठी नागरी विकास सेवाभावी संस्था वतीने राज्यातील शिक्षक, प्राध्यापक यांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड करण्यात आली होती. या गौरव पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुण्यांच्या प्रमुख अतिथी/ व्यक्ते/ हस्ते मा.अँड आनदसिंग बायस सा. विज्ञीतज्ञ हायकोर्ट, मा.अँड मिलिंद पाटील, सा. अध्यक्ष जिल्हा न्यायालय वकील संघ छत्रपती संभाजीनगर, मा. भरत घुनावत साहेब, मा.दिगंबर बंगाळे यांच्या हस्ते संस्थेतर्फे सन्मान पुरस्कार प्रमाण पत्र सन्मान पुरस्कार सोहळा प्रदान करण्यात आला.


यावेळी संयोजक तथा अध्यक्ष एल डी ताटू व प्रमुख उपस्थिती अँड सुभाष कोकुल्डे, भोरासिंग राजपूत, प्रा गुरूदत्त राजपूत, आनंद बारवाल ,अंजली कोकुल्डे, दुर्गासिंग महेर, कल्पेश ताटू, प्रा भिमसिंग काहटे, धरमसिंग राजपूत, गणेश राजपूत, गोवर्धन शेवगण, शामसिंग खोकड, प्रविण राजपूत,दिनेश बलरावत, शाम सिंगल, शाम राजपूत, नारायण उटाडे, प्रेमसिंग चुगडे,सजय घुसिंगे, चदनसिंग काहटे,संजय मेवाळ, कैलास जोनवाल जादुसिंग महेर , नारायण महेर,रुतीक खोकड,राजु चुगडे.राजेंद्र सवाने, पंजाबराव गवई, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
