श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। आर्ट ऑफ लिव्हिंग व श्री रेणुका देवी महाविघालय माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने १० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. शुक्रवार दि,२१ जून रोजी सकाळी ६.३० वा, श्री रेणुकादेवी महाविद्यालयाच्या महाविद्यालयाच्या इंडोर हॉलमध्ये प्रथम रवि शंकर याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक डॉक्टर राम कदम यांनी योगाचे प्रकार सांगत आसन,कपाल भाती,नाडिशोधन, भस्त्रिका, भ्रामरी प्राणायाम ध्यान, सुदर्शन क्रिया,असे विविध योगासनाचे प्रशिक्षण देऊन महत्व सागितले ,दररोज एक तास योग,प्राणायाम,ध्यान, केल्याने तनावमुक्त व उत्साही मन ,नकारात्मक भावनांतुन मुक्तता,आत्मविश्वासात वाढ,प्रभावी निर्णयक्षमता,मनाची एकाग्रता,निर्मळ व कुशाग्र बुद्धि,सक्षम आरोग्य,व रोग प्रतिकारक शक्ती वाढतेअसे अनेक शरीराचे फायदे होत असल्याचे सागितले.
यावेळी संस्थेच्या, प्राचार्य डॉ.टी.एम.गुरनुले. डॉ.राजेन्द्र लोने.क्रिडा संचालक धरमसिंग जाधव , सह्याद्रि पब्लिक स्कूल चे संचालक डि. डि. चव्हाण. बाबासाहेब राठोड, डॉ. दत्ता जाधव ,संदीप जाधव विजय वाढवे अवदूत लाढे यासह सर्व शिक्षक.कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.