उस्माननगर l लोहा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या असून या स्पर्धेमध्ये शिक्षकांचे नेमलेल्या समीक्षक पंचांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक घोषित करण्यात आले आहे. त्या सर्व स्पर्धकांना विभागावर निवड झालेली आहे. स्पर्धेत भाग उतम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला आहे.


यावेळी केंद्रप्रमुख विठ्ठल आचणे, केंद्रप्रमुख डी आर शिंदे, केंद्रप्रमुख राजारुपे, प्रभारी केंद्रप्रमुख मंगल सोनकांबळे, विषय तज्ञ चव्हाण, अकोले, जामकर, रायफळे आदिनी परिश्रम घेतले. विभागावर निवड झालेले स्पर्धक तबला वादन मोटरवार जिल्हा परिषद हायस्कूल माळाकोळी सुगम गायन, सौ मंजुषा देशमुख सिरसाळकर स्वरचित कविता, नरेंद्र कसबे धानोरा (म) वक्तृत्व, धनंजय सोनकांबळे वादविवाद, डॉ. वसंत लुंगारे रांगोळी स्पर्धा, डोके, कथाकथन, मनोज सोनकांबळे जिल्हा परिषद हायस्कूल माळाकोळी लोकनृत्य, अभिनय, योगासने आदी स्पर्धेत तालुका स्तरावरून शिक्षकांची विभागीय स्तरावर निवड करण्यात आलेली आहे.


माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी माधवराव भिसे , उबाठाचे सामाजिक कार्यकर्ते व्यंकट सोनटक्के टेलर , अशोक काळम, सरपंच प्रतिनिधी अमीनशहा फकीर, बालाजी गाडेकर , पत्रकार लक्ष्मण कांबळे , संतोष घोरंबाड, संतोष शेकापुरे, केशव होळगे, प्रसाद गिरी, दिगंबर गिरी, गणेश गिरी, परमेश्वर पा.घोरबांड , स्वप्निल कांबळे , सलीम पिंजारी , सय्यद खैसर , आदींनी अभिनंदन केले आहे.




