नांदेड| चोविसाव्या अमरनाथ यात्रेतील सर्व १०३ यात्रेकरूंची प्रकृती उत्तम असून अमरनाथ व वैष्णोदेवीचे दर्शन व्यवस्थित झाल्यामुळे दुसरा जत्था मंगळवार दि. ३० जुलै रोजी दुपारी अडीच वाजता सचखंड एक्सप्रेस ने नांदेड रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती कटरा येथून आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
१९ जुलै रोजी दिलीप ठाकूर व संदीप मैंद यांच्या नेतृत्वाखाली ९२ यात्रेकरू, ५ टूर मॅनेजर व ६ केटरिंग टीमचे सदस्य नांदेड येथून रवाना झाले होते.पहिल्या ग्रुपमध्ये रत्नामाला व संतोष व पालेकर,सुरेखा व डॉ.उत्तम इंगळे, विजया व डॉ.जीवन पावडे,जयालक्ष्मी व भारत गादेवार, मीनाक्षी व गोविंद नलबळवार, जयश्री व अनिल मुक्कावार,प्रतिभा व विकास गादेवार,सीमा व शंकर गुंडावार,मंगलबाई व पंडितराव माळोदे, अरुणा नळबलवार,आदित्य नलबलवार,सुचिता व विनोद अल्लमपल्लेवार,मुक्ता व अभयकुमार भावठाणकर, सुनंदा व दिगंबर कावळे, अंजमा, अनुजा चिंतलवार,मनकर्णा दंतुलवार,देवेंद्रा पुलेलू, रजनी पाटील, प्रेमा शिंदे, छाया सिंगनवाड, प्रेमा शिंदे यांचा समावेश आहे.
दुसऱ्या ग्रुपमध्ये स्नेहल व साईनाथ पदमावार, प्रतिभा व जयप्रकाश चोधरी, प्रज्ञा व अजय क्षीरसागर, प्रमोद पाटील, गणेश काप्रतवार,परशुराम शिंदे,कैलास डाकोरे ,गणपत गुरुपवार ,श्रीराम अरुटवार,सुरेश इंदूरकर ,अनिला व गणेश उंबरकर,भाग्यश्री व संतोष चोधरी, सायली व साईनाथ लव्हेकर,स्वरूपा दिग्रसकर,स्मिता दिग्रसकर, रुपाली दिग्रसकर,जयश्री व अनिल चालीकवार,विमल व विलास चिद्रावार, शालिनी व मधुकर पोलशेठवार,राजश्री व राजेश्वर गादेवार,ज्योती व शंकर वट्टमवार,भारतीबाई व आनंदा शिंदे ,ओंकार पदमावार यांचा समावेश आहे.निर्गुना व डॉ.विलास चाटे, सिंधु व दिलीप माने,प्रा.महेश लक्ष्मीबाई व व्यंकट पवार , रत्नमाला व रामचंद्र जाधव, मीनादेवी व मोतीलाल अग्रवाल, डॉ. व डॉ.हनुमंत बरकते, रुख्मिणी व बालाजी बामणे, प्रा.वैजयंता व गणेश देसाई, सरिता व गजानन देसाई,अनुसया व संजय कदम,राजेश पाटील यांचा तिसऱ्या ग्रुपमध्ये समावेश होता. टूर मॅनेजर म्हणून विशाल मुळे, मिलिंद जलतारे, लक्ष्मीकांत जोगदंड यांनी चोख कामगिरी बजावली.
ठाणे येथील नयन वेखंडे यांच्या केटरिंग टीमच्या सदस्यांनी वेळेवर ताजे व रुचकर खाद्यपदार्थ दिल्यामुळे सर्वांची प्रकृती उत्तम राहिली. उत्कृष्ट निवास व्यवस्था, आरामदायी बसेस आणि भरपूर मनोरंजनामुळे सर्व यात्रेकरू समाधानी आहेत. दिलीप ठाकूर यांनी एकाच महिन्यात सलग दोन वेळेस अमरनाथ चे व वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे. एकदा अमरनाथचे दर्शन घेतले की जीवन सफल झाले असे मानत असताना दिलीप ठाकूर यांनी आतापर्यंत विक्रमी २४ वेळा अमरनाथ चे व २७ वेळा वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात आले.श्री अमरनाथ, खीर भवानी, गुलमर्ग, श्रीनगर, वैष्णोदेवी या स्थळांना भेट देऊन परतणाऱ्या यात्रेकरूंच्या स्वागतासाठी विविध राजकीय व सामाजिक संघटना, नातेवाईक व मित्र मंडळांनी मंगळवारी दुपारी नांदेड रेल्वे स्थानकावर उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर व संदीप मैंद यांनी केले आहे.