नांदेड। मारवाडी धर्मशाळा परीसरातून डॉक्टरांचे घरातून मोवाईल चोरणारा चोरटयास वजीराबाद गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे, पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं सर्व स्तरातील नागरिकांतून कौतुक केले जाते आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की,दिनांक 26.08.2024 रोजी तक्रारदार डॉ. दिपेशकुमार द्वारकादास शर्मा यांनी फिर्याद दिली की, दिनांक 25.08.2024 रोजी सायंकाळी 07.53 वाजताचे सुमारास माझे मारवाडी धर्मशाळेच्या पाठीमागील घरामधुन एक ओपो कपंनीचा मोबाईल किंमती 20,000/- रुपयाचा चोरटयांनी चोरुन नेला आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड येथे गु.र.न. 427/2023 कलम 303 (02) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपासकामी पोहेकॉ/412 कानगुलवार यांचेकडे देण्यात आला.


सदर प्रकरणी अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, किरतिका, सहाय्यक पोलीस अधिक्षक, उप विभाग नांदेड शहर यांनी गुन्हयातील चोरयांचा शोध घेऊन त्याचेकडुन मोबाईल फोन हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणनेवावत परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद यांना आदेशीत केले.

सदर आदेशाप्रमाणे परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे, आर.डी. वाणे, सहा. पो. नि. पोहेकॉ/2083 दत्तराम जाधव, पोहेकॉ /412 कानगुलवार, पोना/1353 शरदचंद्र चावरे, पोकॉ/3088 बालाजी कदम, पोकॉ/14 भाऊसाहेब राठोड, पोकॉ/3113 अंकुश पवार यांनी घमास्थळी भेट देऊन फिर्यादीचे घरातील सिस्तिव्ही फुटेजची पाहणी करुन बातमीदार यांचे मदतीने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सदर सिस्तिव्ही फुटेजमधील आरोपी हा संघरत्न विलास दिपके रा. देगांवचाळ नांदेड हा असल्याचे निष्पन्न केले. त्याचा शोध घेता तो मिळुन येत नव्हता.

काल दिनांक 28.08.2024 रोजी आरोपी संघरत्न विलास दिपके रा. देगांवचाळ नांदेड हा कोर्टचे पाठीमागील पडीत खोलीमध्ये असल्याची माहीती मिळाली. त्यावरुन सदर ठीकाणी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचला. पोलीसांना पाहताच सदर आरोपी पळून जात असतांना त्यास पकडुन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये चोरीस गेलेला मोबाईल व दुसरा एक मालकी हक्क नसलेला मोवाईल असे दोन मोबाईल किंमती 35,000/- रुपयाचे जप्त करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला असल्याने वरीष्ठांनी त्यांचे कौतुक केले आहे.