हिमायतनगर,अनिल मादसवार| स्मशान भूमी हे माणसाच्या शेवटचं स्थान आहे, या याठिकाणी आल्यानंतर मानुषयाला चिरशांती मिळत असते. त्यामुळे अश्या स्थळाचा कायापालट करण्याचा संकल्प सकाळच्या योग समितीच्या सदस्यांनी करून हे सत्यात उतरविले आहे. या सामाजिक कार्यासाठी त्यांना सहकार्य करणाऱ्या हिमायतनगर शहरातील सर्वांचे काम अभिनंदनास पात्र असून, स्मशानभूमीला स्वर्ग बनविण्याचा काम कौतुकास्पद हे कौतुकास्पद आहे. आगामी काळात येथे बसण्यासाठी शेड आणि इतर सोइ सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी ईश्वर तुम्हाला शक्ती देवो अश्या प्रकारचे आशीर्वाद पपू.बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी दिले.
ते हिमायतनगर शहरातील लकडोबा चौक परिसरात असलेल्या वैकुंठधाम हिंदू स्मशान भूमीला दिनांक ०१ ऑगस्ट रोजी भेट दिल्यानंतर नांदेड न्यूज लाइव्हशि प्रतिक्रिया देताना बोलत होते. दुपारी श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्तची बैठक संपन्न झाल्यानंतर पिंपळगाव दत्त संस्थांचे मठाधिपती परमपूज्य बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी हिंदू स्मशान भूमीला भेट दिली. आणि येथील स्मशान भूमीचा कश्या प्रकारे कायापालट झाला यांचा निरीक्षण केले. या हिंदू स्मशान भूमीची स्वच्छता, लावण्यात आलेली विविध झाडे, विद्दुत रोषणाई स्मशान भूमीचा प्रशस्त परिसर आदी बाबतची पाहणी करून यासाठी मेहनत घेतलेल्या गुडमॉर्निग ग्रुपच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले.
तसेच या ठिकाणी श्री परमेश्वर मंदिराकडून देण्यात आलेल्या भगवान महादेवाच्या मूर्तीचे निरीक्षण करून मंदिरातर्फे राबविण्यात येणाऱ्या समाज कार्याची प्रशंसा केली. तसेच यापुढे स्मशान भूमीत येणाऱ्या सर्वाना प्रसन्न वाटावे म्हणून येथे बसण्यासाठी भव्य शेड आणि इतर सोइ सुविधा उपलब्ध करण्यासाठी मेहनत आणखी मेहनत घेऊन काम करावे अश्या सूचना व आशीर्वाद स्मशान भूमी विकास समितीच्या उपस्थित सदस्यांना दिल्या. यावेळी महाविरचंद श्रीश्रीमाळ, डॉ.राजेंद्र वानखेडे, मारोतराव लुम्दे, सुभाष बलपेलवाड, विलासराव वानखेडे, सुभाष शिंदे, मायंबा होळकर, हभप जाधव महाराज, ज्ञानेश्वर शिंदे, संजय माने, श्यामराव पाटील, रामभाऊ नरवाडे, अनिल भोरे, पंडित ढोणे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.