नांदेड/हिमायतनगर| आदिलाबाद हून पुर्णाकडे जाणाऱ्या डेमो रेल्वेगाडीत लाईटची व्यवस्था नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या तुघलकी कारभारांबाबत प्रवाश्यांतून कमालीची नाराजी (Darkness in the Purna to Adilabad demo train: Passengers in a panic ) व्यक्त केली जात आहे. रेल्वेगाडीत अंधाराचे साम्राज्य पसरल्याने चोरीच्या घटना घडल्या असल्याचे प्रवाश्यांकडून सांगण्यात आले.


गरिबरथ म्हणून रेल्वेगाडी सुपरीचित आहे. तिकिट दर गोरगरिबांना परवडणारा असल्याने बहूतांश प्रवाशी रेल्वेगाडीला पहिली पसंती देतात. दि. १२ मार्च दुपारी ३ वाजता आदीलाबादहून निघालेल्या डेमोला लाईटचीच व्यवस्था नव्हती. आज घडीला ही रेल्वेगाडी आदिलाबाद हूनच उशिरा निघाल्यामुळे भोकर पासूनच अंधार पडायला सुरुवात झाली.

मुदखेड ते नांदेड पर्यंत प्रवाश्यांनी अंधारात जीव मुठीत धरून प्रवास केला. या दरम्यान अनेकांच्या बॅग चोरीला गेल्या व तसेच महिला व मुलींची चांगलीच हेळसांड झाली. रेल्वे प्रशासनाच्या या बेताल व आडमुठ्या काराभारांचा प्रवाश्यांनी निषेध व्यक्त केल आहे. रेल्वे विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबींकडे तात्काळ लक्ष पुरवून प्रवाश्यांची होत असलेली गैरसोय तात्काळ थांबवावी. अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
