किनवट, परमेश्वर पेशवे। इस्लापूर शहराला पंधरा ते वीस दिवसच पाणी साठा पुरेल एवढाच पाणी साठा सहस्रकुंड मध्ये असल्याने इस्लापूर वाशीयांना अखेर पाण्यासाठी वणवण भटकावं लागते की काय अशी परिस्थिती सध्याला दिसून येत आहे.


जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातच पैनगंगा नदी ही कोरडी पडल्याने या भागातील जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
त्याच अनुषंगाने पैनगंगा नदीवरील 15 ते 16 गावच्या नागरिकांनी पैनगंगा नदी पात्रामध्ये पाणी सोडावे यासाठी तब्बल सहा दिवस पैनगंगा नदी पात्रामध्ये आमरण उपोषण सुरू केले होते जिल्हा प्रशासनाने नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिल्याने अखेर हे उपोषण मागे घेण्यात आले.

मात्र अद्याप पर्यंत पैनगंगा नदी पात्रामध्ये इसापूर धरणाचे पाणी सहस्रकुंड पर्यंत आलेच नाही त्यामुळे अखेर सहस्त्रकुंडातील पाण्याने अखेर तळ गाठला आहे. याच कुंडातून इस्लापूर शहराला पाणीपुरवठा करत असताना रोज चार ते पाच फूट पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात असून पाणीपुरवठा करणारी विद्युत मोटर रोज पाच फूट खाली कुंडातील पाण्यात सोडावी लागत आहे.

रोज पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असताना अखेर सहस्त्रकुंडातील पाण्याने तळगाटला असता उन्हाळ्यातील पुढील मार्च, एप्रिल, मे,असे साडेतीन महिने इस्लापूर शहराला पाणीपुरवठा कसा होणार असा प्रश्न निर्माण होत असून इस्लापूर वासियांना पाण्यासाठी वन वन भटकावं लागते की काय अशी परिस्थिती उद्भवणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आत्तापर्यंत असे कधीही झाले नव्हते मात्र पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यातंच सहस्त्रकुंडातील पाण्याने तळ गाठल्याची माहिती येथील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी दिली.

त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढील उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेऊन नदीपात्रावरील सर्वच गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार नाहीत यासाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.