“समाजस्वर” “समाजशब्द” आणि “समाजविद्या” पुरस्कारांचे होणार वितरण
नांदेड| राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा महापरिनिर्वाण दिन आणि काशिनाथ वाठोरे यांच्या ९ व्या स्मृतिदिना निमित्त आंबानगर (सांगवी बु.) नांदेड येथे मंगळवार दि. २० डिसेंबर २०२२ रोजी राज्यस्तरीय संगीतमय गितगायन महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १०.३० वा. बालाजीराव गच्चे नांदेड यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून विद्रोही प्रबोधनकार कैलासदादा राऊत हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिराबाई काशिनाथ वाठोरे ह्या राहणार आहेत. या महास्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि ५००० रु., ३००० रु., २००० रु. आणि १००० रु. अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
संगीतकार तथागत आणि समाधान राऊत नांदेड यांचे ऑर्गन, पॅड, बॅझो, ढोलक, तबला आदी अत्याधुनिक संगीत साहित्य सर्व स्पर्धकांसाठी उपलब्ध असेल. या स्पर्धेसाठी नांदेड शहर, नांदेड सिडको, किनवट, नायगाव, अर्धापूर, हिमायतनगर, हदगाव, उमरखेड, मुदखेड, भोकर, बाळापूर, वसमत, जालना, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, अमरावती, चिमूर, चंद्रपूर, पुणे आणि धर्माबाद येथील ५८ स्पर्धकांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
चंद्रप्रकाश देगलूरकर यांना पुरस्कार
या कार्यक्रमाच्या आयोजनाचे हे ९ वे वर्ष असून या कार्यक्रमांत तीन विशेष व्यक्तीमत्वांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. “गीतगायन” प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी “समाजस्वर” पुरस्कार देऊन यावर्षी शाहीर बळीराम हनवते, हिमायतनगर यांना, “साहित्य” प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी “समाजशब्द” पुरस्कार देऊन इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, नांदेड यांना आणि “ज्ञान-विज्ञान” प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी ‘समाजविद्या’ पुरस्कार देऊन प्रा. डॉ. भास्कर दवणे, नांदेड यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून निराबाई प्रभाकरराव गोखले, सरस्वताबाई तुकाराम गोखले, जिजाबाई ग्यानबाजी गोखले, विठ्ठलराव रणवीर, पांडुरंग दिपके कुरुळी, किसनराव भोरे भानेगाव, भीमराव राऊत कुपटी, मिलिंदराव गोखले आणि शिवाजीराव कवडे आदीलाबाद उपस्थित राहणार आहेत.
या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला सर्व बहुजनांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक तथा व्यवस्थापक भालचंद्र वाठोरे, भारत वाठोरे, डॉ. सुनील गोखले, डॉ. माणिक साळवे, राजकुमार कवडे, संजू गोखले, संजय वाठोरे, महेंद्र नरवाडे किनवट, प्रा. प्रदीप एडके किनवट, एल. जी. खंदारे वसमत, बी. सी. पाईकराव डोंगरकडा, डॉ. पंडित वाठोरे, विलास बिदाजी वाठोरे, मनोहर सोनाळे, साहेबराव पंडित, सुभाष नारायण राऊत, पत्रकार गौतम यांनी केले आहे.