लोहा। परम श्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराजांचे घोषवाक्य आहे “घर घर जायेंगे – सबको योग सिखायेंगे।” या उद्दिष्ट पूर्तीसाठी नांदेड जिल्हाभर एक जून पर्यंत १०१ ठिकाणी निशुल्क योग शिबिरे लावण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लोहा येथील कै. विश्वनाथराव नळगे विद्यालय या ठिकाणी १६ ते २२ डिसेंबर दरम्यान निशुल्क योग शिबिर संपन्न झाले.
या शिबिरास योगशिक्षक तथा आयुर्वेद तज्ञ अनिल अमृतवार, हनुमंत ढगे, राम शिवपनोर, डॉ. नंदिनी चौधरी, सविता गबाळे, डॉ. मधुसुदन चेरेकर, अनिल आर्य, विठ्ठल सोळुंकी आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. पंढरीनाथ कंठेवाड, अनिल कामिनवार, शिवाजीराव शिंदे हळदेकर, विद्या सोरगे आदि मान्यवर नांदेड वरून या शिबिरास हजेरी लावत होते. घरोघरी पॉम्प्लेट वाटण्यापासून सर्व व्यवस्था लोहा पतंजली योग समितीने केली.
या शिबिरास सर्वश्री मा. आ.रोहिदासजी चव्हाण , केरबासावकार बिडवई, लक्ष्मीकांत बिडवई, वैजनाथ खेडकर, विलास नागेश्वर, दीपक भातलवंडे, विश्वांभर वाडेवाले, मोहन पवार, शिवकांत स्वामी, दिलीप रहाटकर, दिगांबर भालके, किरण पेनुरकर, विठ्ठल पांचाळ सर ए व्ही इन्फोटेक, बालाजी अंकुलवार, राहुल बिडवई, संदीप सुराणा, संजय चालीकवार, महेश आंबेकर, गजानन दांगटे, प्रवीण धुतमल, सचिन महाजन, अविनाश अवधूतवार, सुनील रहाटकर, आनंद भोस्कर, बाबुराव केंद्रे, विठ्ठलराव मोरे, दत्ता कांबळे, विठ्ठल पांचाळ, भगवान सकनुरे, केरबा खरात, बालाजी जाधव, माधव खरात, पद्माकर पालीमकर, रेश्माजी दांगटे, गोविंद वड, देवराव वसमतकर, आशाताई चव्हाण, डॉ. सविता घंटे, शोभाताई बगडे, खेडकर ताई, स्वामी मॅडम, घंटे ताई, प्रिया रुद्रावार, माधवी मोरलवार, रेणुका ताई आंबेकर, खरात ताई. वैभव वाडेवाले, दिलीप कवटीकवार, कृष्णाबाई इंगळे, शंकर राठोड, दयानंद मल्लुरवार, संभाजी इंगळे, भगवान सकनुरे आदी मान्यवर उपस्थित होते.