क्राईमनांदेड

Sonkhed police nabs illegal sand transporter : सोनखेड पोलीसांनी अवैध रेती वाहतुक करणारा हायवा पकडला; 20 लक्ष 25 हजारच मुद्देमाल जप्त -NNL

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील “सोनखेड पोलीसांनी एक अवैध रेती वाहतुक करणारा हायवा किंमती 20 लक्ष 25 हजार रुपये किमतीचं मुद्देमाल जप्त केला आहे. सोनखेड पोलीसांनि केलेल्या कामगिरीचे वरिष्ठानी अभिनंदन केले असून, या कार्यवाहीमुळे अवैद्य धंदा एकरणार्यात खळबळ उडाली आहे.

अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड खंडेराव धरणे, अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधीकारी इतवारा यांचे मार्गदर्शनाखाली पांडूरंग माने, सहा पोलीस निरीक्षक पो.स्टे सोनखेड, सहा.पो.उप. निरीक्षक जि.एन. गित्ते पो.स्टे सोनखेड, पोहेकों / ब.नं.2300 ए.एच. कदम पो.स्टे सोनखेड 4) पोहेकों / ब.नं.2699 डब्लू. एम. नागरगोजे पो.स्टे सोनखेड, पोना/ब.नं.2547 एस. के. वाघमारे पो.स्टे सोनखेड यांनी हि कार्यवाही केली.

याबाबत सविस्तर अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी अवैध धंदयावर कारवाई करणे बाबत सर्व पो.स्टे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स.पो. नि माने सा. यांचे आदेशान्वये पोलीस स्टेशन सोनखेड येथील पोलीस पथक नेमुन दिनांक. दिनांक 18/11/2024 रोजी सोनखेड पोलीस पेट्रोलींग करीत असताना माल्ल्या गोपनीय माहीतीवरून मौजे पेनुर ता. लोहा गोदावरी नदी पात्रातुन अवैध रेतीची चोरी करून विकी करण्याचे उ‌द्देशाने घेवुन जात होते. त्यावरून सोनखेड पोलीस पथकानी छापा मारला असता हायवा क. MH-12 HD-7882 हा अवैध रेती वाहतुक करीत असताना मिळुन आला. त्यांच्या ताब्यातील 25,000/- रू किमतीचे पाच ब्रास रेती, 20,00000 किमतीचा एक हायवा क. MH-12 HD-7882 वाहन आणि चालक बंडू रंगनाथ चव्हाण वय 35 वर्षे व्यवसाय चालक रा. बोरगांव तांडा ता.लोहा जि. नांदेड यास ताब्यात घेतले.

हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड खंडेराव धरणे, अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधीकारी इतवारा यांचे मार्गदर्शनाखाली पांडूरंग माने, सहा पोलीस निरीक्षक पो.स्टे सोनखेड, सहा.पो.उप. निरीक्षक जि.एन. गित्ते पो.स्टे सोनखेड, पोहेकों / ब.नं.2300 ए.एच. कदम पो.स्टे सोनखेड 4) पोहेकों / ब.नं.2699 डब्लू. एम. नागरगोजे पो.स्टे सोनखेड, पोना/ब.नं.2547 एस. के. वाघमारे पो.स्टे सोनखेड यांनी हि कार्यवाही केली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!