नांदेड| मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता मतदान करण्याबाबत आवाहन असलेले स्टिकर्स विविध विभाग प्रमुखांच्या वाहनांवर लावण्यात आले.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्राम पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण घुले, गट विकास अधिकारी शेखर देशमुख, बळवंत, डॉ. पुरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार, प्रलोभ कुलकर्णी यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.