नांदेड| शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पासदगाव व नांदुसा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख प्रमोद (बंडू) खेडकर, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांच्या वतीने शाळेच्या बॅगचे वाटप उपक्रमाची संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आहे . नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळेतील जवळजवळ साडेपाच हजार विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक राजकारणाचा वसा घेऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने अनेक नाविन्यपूर्ण आणि लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले . वाढदिवसाचे औचित्य साधक सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे , जिल्हाप्रमुख बंडू खेडकर , जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य पालकांच्या पाल्यांसाठी मोफत स्कूल बॅग वाटपाचे आयोजन करण्यात आले होते . आज नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पासदगाव आणि नांदुसा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात , धोंडू पाटील, विधानसभा प्रमुख भागवत कदम, हिंगोलीचे जिल्हाप्रमुख गोपू पाटील, कार्यक्रमाचे संयोजक सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख बबन बारसे, जिल्हाप्रमुख बंडूभाऊ खेडकर, विभागीय सचिव युवा सेना महेश खेडकर, जिल्हाप्रवक्ता डॉ.बालाजी पेनुरकर, उपजिल्हाप्रमुख योकोबा येडे, उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण, युवा सेनेचे सुनील पाटील कदम, विधानसभा प्रमुख मुकुंद जवळगावकर, उपशहर प्रमुख रमेश पाटील कोकाटे, बाळासाहेब देशमुख, शहर प्रमुख गौरव कोटगिरे, बळवंत तेलंग, गजानन हरकरे, रवी नागरगोजे, विजय खामनकर, कृष्णा कवठेकर, माधव मामा कल्याणकर, नवनाथ माधापुरे, पुरभाजी जाधव,
राहुल जाधव, राम काळेकर, संजय जनकवाडे,चंद्रकांत जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष नरहरी जाधव, भुजंगराव जाधव, राजाराम जाधव, कैलास जाधव, लक्ष्मणराव पाटील मा.पोलीस पाटील, नंदू सर शाखाप्रमुख निळकंठ जनकवाडे, प्रवीण जनकवाडे भगवानराव पाटील, देवानंद पाटील ,कोंडीबा पाटील जनकवाडे ,राजू जनकवाडे सरपंच, किशनराव जनकवाडे, प्रल्हाद जनकवाडे आदि शिवसैनिक व गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते, या कार्यक्रमास राबवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकानी सहकार्य केले.