नांदेड| ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार माली गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.


पोलीस ठाणे देगलुर हद्दीतुन दिनांक 16/08/2024 रोजी कार्यक्रमास आलेल्या फिर्यादीचे कारचा काच फोडुन कार मधील 14,00,000/- रुपये अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते. त्यावरुन पोलीस ठाणे देगलुर येथे गुरनं. 394/2024 कलम 305 भा. न्या. सं. प्रमाणे गुन्हा दाखल होता. नमुद गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन गेलेली रक्कम हस्तगत करण्याबाबत पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी सपोनि / संतोष शेकडे यांचे पथकास आदेशीत केले होते. त्यावरुन स्थागुशाचे पथकांने मिळालेल्या गुप्त बातमीआधारे दिनांक 29/08/2024 रोजी मौ. औराद जिल्हा बिदर राज्य कर्नाटक येथे जावुन आरोपी नामे 1) जकरीया देवदार सल्ला वय 24 वर्ष राहणार राजमंगलय, वेलीवक्कम चेन्नई राज्य तामीळनाडु 2) सुनिलो कुचूरा लक्ष्मय्या वय 25 वर्ष, राहणार चिल्लवषम, 2-49 कॅथी ए कोनो चेन्नई यांचा शोध घेत असताना, ते दिसुन आल्याने त्यांचा पाठलाग करते वेळी नमुद आरोपीतांनी त्यांचे ताब्यातील बॅग टाकुन पळुन गेले सदर बॅग मध्ये पाहणी केले असता, त्यामध्ये रोख रक्कम असल्याचे दिसुन आले. त्यावरुन फिर्यादीस विचारपुस केली असता, सदर वर्णनाची बॅग ही फिर्यादीची असल्याचे ओळखल्याने सदरची रक्कम ही गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाल्याने बॅग मधील रोख 10,00,000/- रुपये जप्त करण्यात आले आहे.


सदरची कामगिरी मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, सपोनि / संतोष शेकडे, पोउपनि/ साईनाथ पुयड, नरहरी फड, पोलीस अमंलदार मोतीराम पवार, महेश बडगु, तानाजी येळगे, गंगाधर घुगे, अनिल बिरादार स्थागुशा, नांदेड व सायबर सेल चे दिपक ओढणे व राजु सिटीकर व पो. स्टे. देगलुर येथील सुधाकर मरदोडे, शिवाजी आडबे, मरगेवार, सगरोळीकर, मोटरगे, बुंगई यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.




