श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। तालूक्यातील दुसर्या टप्यातील २६ ग्रामपंचायत करिता दि, १८ रोजी किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडले तांदळा, पाचूंदा, महादापूर,कुपटी,पवनाळा,लखमापूर,मालवाडा,बोरवाडि,पानोळा,वानोळा,गुंडवळ,इवळेश्वर,बंजारातांडा,पडसा,मच्छिन्द्रा पार्डि,,दिगटी कू,हिंगणी,शेख फरीद वझरा,मांडवा, दत्तमांजरी,वायफणी, भोरड,रूई, भगवती,लांजी,शेकापूर या ग्रामपंचायतचा समावेश आहे.
यामध्ये शेकापूर,भगवती,व बंजारा तांडा या गावामध्ये बिनविरोध सरपंच निवडण्यात आला आहे तर हिंगणी येथे सरपंच करीता ऐकही अर्ज आला नाही,त्यामुळे हिंगणी येथे केवळ सदस्य पदा करीता मतदान पार पडले ३ सरपंच व ३० सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
२२ ग्रामपंचायत सरपंच पदा करीता ७६ उमेदवार तर १६१ सदस्य पदा करीता ३८४ उमेदवारांचे रविवार दि,१८ रोजी ६९ बुथ वर मतदान झाले वसरामनाईक तांडा हे गाव पैसा अंर्तगत आहे पंरतु या गावात ऐकहि अनुसूचित जाती/जमाती( ST) चे घर नसल्यामुळे येथे मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला. लखमापूर, लांजी, वानोळा, दत्तमाजरी, तादळा,कूपटी, येथे मोठी चुरस दिसून आली,नव्यानेच हक्क बजावणार्या युवक मतदारात उत्साह दिसून आला.
सकाळी मतदानाचा जोर वाढला होता संपूर्ण ६९ बुथ वर ८१,९६/ टक्के मतदान झाले यामध्ये १०८८६ पूरुष ९५५५ स्त्री असे ऐकून २०४४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांनी दिली. उमेदवारांचे भवितव्य मगळवार दि,२० रोजीच्या मतमोजणी नंतरच समजेल पण सर्वच उमेदवार आकडेवारी काढून मीच निवडून येणार असल्याचा दावा करीत आहेत.