उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर-येथून जवळच असलेल्या पोखरभोसी ता. लोहा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड दत्तनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे.


या सप्त्यामधील दैनंदिन कार्यक्रम १९ डिसेंबर रोज सोमवार पासून नाम सप्त्यास सुरूवात झाली आहे.सकाळी ७ ते ९ बाळक्रिडा ग्रंथाचे पारायण ,सायंकाळी ५ ते ६ आनंद पाठ,सायंकाळी ६ ते ९ महापूजा, रात्री ९ ते११ किर्तन व पहाटे भूपाळी होनार आहे. आनंद संप्रदायाचे महामेरू ,परज्ञानी महंत बाळगीर गुरू मोहनगीर महाराज व ब्रम्हचारी वैरागी महाराज यांच्या आशिर्वादाने सदरील सप्त्याचे पोखरभोसी येथे उत्साहात सोहळ्यास प्रारंभ झाला आहे.


अखंड दत्तनाम सप्त्यामध्ये किर्तनकार म्हणून दि.२१ डिसेंबर रोज बुधवारी द. भ.प.दत्तराम पाटील ताटे,दि.२२ डिसेंबर रोज गुरूवार ह्या दिवशी द.भ.प. शिवाजी पाटील शिंदे टाकळीकर दि.२३ डिसेंबर रोज शुक्रवार ह्या दिवशी द.भ.प. शामसुंदरगीर महाराज आष्टीकर ,दि २४ डिसेंबर रोज शनिवार ह्या दिवशी द.भ.प .आनंदबन महाराज व दि.२५ डिसेंबर रोज रविवार ह्या दिवशी द.भ.प. रूद्रगीर महाराज किवळेकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.

काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे कार्यक्रमाचे संयोजक श्री १०८ महंत अवधूतगीर गुरू गणेशगीर महाराज व समस्त गावकरी मंडळी यांनी आव्हान केले आहे.
