हदगाव, शेख चांदपाशा। हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या बँकेच्या शाखेद्वारे त्वरीत पीक पेरणी करिता कर्ज वाटप व्हावे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्याला लावण्यात आलेले ‘होल्ड त्वरीत काढण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर यांनी एका निवेदनद्वारे स्टेट बँकेचे व्यावस्थापक यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात दि.19 जून 2024 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हदगाव तालुक्यातील शेतकरी फार अर्थिक आडचणीत आहे. यामध्ये बँकेने अडवणुकीचे धोरण अवलंबवीलेले आहे. शेतकरी यांच्या सेंव्हिग खात्यामधील सन्मान निधीची जी जमा झालेली रक्कम पीक विमा व अनुदान आलेली रक्कम यावर जो स्थानिय बँकेने लावण्यात आलेल होल्ड आहे, तो लगेच काढण्यात यावा.कर्ज मिळवण्यासाठी आपल्या शाखेअंतर्गत शेतक-याच्या ज्या आडचणी आहेत . जसे शेतक-याची केवायसी अधारलिक त्या विनाविलंबा दुर करण्यात यावे.
तसेच शेतक-याच्या पेरणी करिता पीक विमा कंपनीकडून पीक विमा देण्यासाठी कुचराई करित आहे. शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे सन 2023 फार मोठे नुकसान झालेल असतांना ही पीक विमा मिळालेल नाही. परिणाम स्वरुप शेतकरी अर्थिक सकटात सापडेलल आहे. ह्या बाबीचा विचार करुन आमच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात. अन्यथा आम्हाला नाईलाजाने सनदी मार्गाने आपल्या बँकेच्या शाखे समोर घंटानाद आदोलन करावं लागेल असा इशारा निवेदनद्वारे दिलेल आहे. या निवेदनावर प्रल्हाद पाटील, शिवाजी वानखेडे कोथळेकर, ज्ञानेश्वर हेद्रे, संदीप पाटील ह्याच्या सह्या आहेत.