नांदेड। नांदेड दक्षिण हा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत नेतृत्व बदल करणारा मतदार संघ होय.नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मानसिकता या भागातील मतदारांची असते त्यामुळे “प्रभावी”नेतृत्व”मिळवूनही या जनतेला हक्काचा नेता मिळू शकला नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नेते आमदार हेमंत पाटील यांचा मतदार संघ अशी ओळख झालेल्या या भागात गेल्या वेळी मोहन अण्णा हंबर्डे यांनी विजय मिळविला. पण या निवडणुकीत त्यांना नवख्या आनंदराव पाटील बोंढारकार यांनी मात दिली.त्यांना प्रतापराव व -हेमंत पाटील यांची साथ मिळाली नवीन आमदार असलेले तरी कट्टर शिवसैनिक आहेत.माजी आमदार हंबर्डे हे राष्ट्रवादी कोंग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत .नांदेड दक्षिण ची स्वारी पुन्हा यशस्वी करण्यासाठी त्याच्या पुढे आ हेमंत पाटील व आ बोढारकर यांचे तगडे आव्हान राहणार आहे


नांदेड दक्षिण हा मतदार संघ पुनर्रचना मध्ये २००९ मध्ये अस्तिवात आला. एका जात समूहायचे प्राबल्य नसलेला हा मतदारसंघ शहरी बहुलक व लोहा तालुक्यातील सोनखेड या भागाचा समावेश आहे . मुस्लिम-मागासवर्गीय यांची संख्या निर्णायक असली तरी इतर समूह लक्षणीय आहे.आमदार निवडून आले की चार वर्षे या भागातील जनता कार्यकर्ते त्याच्या मागे पुढें राहतात.आणि शेवटच्या वर्षात हेच त्या आमदारां विषयी निगेटिव्ह वातावरण करतात.त्यामुळे अहोरात्र वैयक्तिक सहकार्य व विकास कामे करूनही मतदारसंघ दुसऱ्यांदा संधी देत नाहीत हे चार विधानसभा निवडणुकीतून दिसले.

पाहिले आमदार ओमप्रकाश पोकर्ना ( ,काँग्रेस-२००९) हेमंत पाटील (शिवसेना-२०१४) मोहन हंबर्डे (,काँग्रेस-२०१९) यांनी नेतृत्व केले.आमदार म्हणून यांचा लोकसंपर्क जबरदस्त होता तरीही लोकांनी पुन्हा संधी दिली नाही.आ हेमंत पाटील व त्याच्या सुविद्य पत्नी राजश्री पाटील यांचा जनसंपर्क प्रचंड होता पण त्यांना नेतृत्व मान्य केले नाही तीच अवस्था मोहन अण्णा हंबर्डे यांच्या बाबतीत तसेच झाले.आमदार म्हणून आनंदराव बोढारकार ( २०२४-शिवसेना) यांना नेतृत्वाची।संधी मिळाली .तर भाजपाचे माजी महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते याना दोन वेळा विजयाने हुलकानी दिली. नशिबाने त्याची आमदारकी ओढून घेतली. काँग्रेस -शिवसेना अशी आदळून बदलून संधी देणारा या मतदारसंघात प्रतापराव पाटील यांची भूमिका निर्णयाक ठरते.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सोबत भाजपा मध्ये न जाता काँग्रेस मध्येच राहणे पसंत करणाऱ्या मोहनअण्णा हंबर्डे याना काँग्रेस नेत्यांनी” हात ” दिला.आणि निसटता पराभव त्यांच्या पदरी आला.आता या मतदारसंघात आमदार हेमंत पाटील व नवे उभरते नेतृत्व आनंदराव पाटील बोढारकर यांनी भक्कम पाय रोवणे सुरू केले आहे.त्यातच प्रतापराव व हेमंत पाटील यांच्यात” एकसुर ” जुळते आहे. अशोकराव विरुद्ध प्रतापराव या राजकीय लढतीच्या दुसऱ्या “इनिंग”मध्ये भाजपा विरोधात असलेले थ्रीम एम(.मराठा-मुस्लिम-मागासवर्गीय) आणि माजी मुख्यमंत्री याच्या राजकीय दबदबा उतरत्या मार्गावर (?) त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी। तयारी सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणूकीत सलग दोनवेळा भाजपाच्या पराभवाची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. माजी आ मोहनअण्णा हंबर्डे यांचा जनसंपर्क दांडगा आहे .त्यानी पाच वर्षे कामे केली पण या मतदारसंघातील मतदाराना ते पचनी पडले नाही.जे आ हेमंत पाटील माजी आ ओमप्रकाश पोकर्णा याच्या बाबतीत घडले त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आ बोढारकर यांनी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
दुबळ्या काँग्रेसच्या तुलनेत जिल्ह्याचे नेते प्रतापराव याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस माजी आ हंबर्डे यांची” नवीन इनिग ” सुरू होते आहे पण त्याच्या समोर विधान परिषदेचे शिवसेना गटनेते आमदार हेमंत पाटील व नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील यांचे तगडे आव्हान राहणार आहे त्याना चिखलीकर याचे पाठबळ राहणार आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेन असा राजकीय “द्वंद्व ” नांदेड दक्षिण च्या मैदानावर सुरू झाले आहे.त्यात भाजपा आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी रिंगणात उरणार आहेच.येत्या काळात या मतदारसंघात कोणत्या राजकीय पक्षाचे वर्चस्व राहील याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.