नांदेड,अनिल मादसवार| भोकर विधानसभेच्या भाजप महायुतीच्या उमदेवार श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांच्या विजयासाठी गुजरातमधील प्रसिद्ध कुबेर भंडारी देवस्थानला महादूग्धाभिषेक करणार असे साकडे घातले होते. आता श्रीजयताई आमदार झाल्यामुळे पुढील महिन्याच्या अमाश्येला आपण कुबेर भंडारी देवस्थानला जाऊन महादूग्धाभिषेक करणार असल्याची माहिती सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी दिली.
भोकरच्या विकासाचे स्वप्न पाहणार्या व तरूण तडफदार नेतृत्व असलेल्या श्रीजयाताई चव्हाण यांची भोकर मतदारसंघाप्रती असलेली आत्मीयता व काम करण्याची पद्धत पाहून अख्खा मतदारसंघ भारावून गेला आहे. नवनिर्वाचित आमदार श्रीजयाताई चव्हाण यांच्या रूपाने भोकर मतदारसंघाला दडफदार, अभ्यासू, विकासाची जाण असलेले नेतृत्व लाभले आहे.
सुभाष देशमुख हे चव्हाण घराण्याचे निकटचे आणि विश्वासू मानले जातात. कोरोना महामारीने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनाही घेरले होते, त्यावेळीही देशमुख यांनी कुबेरनाथ देवस्थान येथे जावून त्यांच्यासाठी महामृत्यूंजय अभिषेक करून त्यांना या महामारीतून मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थना केली होती. त्यांच्या विजयासाठी देशमुख यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता.
श्रीजयाताई चव्हाण यांना भोकर मतदारसंघात राजकारणात एन्ट्री द्यावी अशी विनंती मागील पाच वर्षांपूर्वी एका पत्राद्वारे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली होती. तसेच या विधानसभा निवडणुकीतही त्यांना उमेदवारी द्यावी, असाही आग्रह देशमुख यांनी सर्वप्रथम केला होता. विधानसभा निवडणुकीत श्रीजयाताई चव्हाण यांचा दणदणीत विजय झाल्यामुळे आपला नवस पूर्ण करण्याचा संकल्प देशमुख यांनी केला आहे.