लोहा। पाच वर्षीत दळणवळणाची सुविधा व्हावी रस्ते आरोग्य शिक्षण यासह जल सिंचनासाठी प्रयत्न दुरु राहणार असून येत्या काळात धोंड प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा राहणार आहे जेणेकरून या भागात शेती सिचनासाठी त्याचा उपयोग होईल.आपण नेहमीच जाती विरहित राजकारण केले कधीच जातीभेद केला नाही आणि करणार नाही आपला हात -घडी “के साथ असावा असे अहवान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.


लोहा तालुक्यातील बेरळी ते देऊळगाव फाटा या १६२.१७ लक्ष रुपये निधी खर्चून रस्ता होणार आहे त्याचे भुमिपुजन शनिवारी (१५ मार्च) आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते देऊळगाव येथे करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष देऊळगाव चे सरपंच मारोतराव सोनवळे होते प्रमुख पाहुणे म्हणून , माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी,माणिकराव,मुकादम, राकॉ पार्टी कंधार तालुकाध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर, राकाँ पार्टी तालुकाध्यक्ष छत्रपती स्वामी, माजी सभापती अशोक पाटील मुगावकर, ,माजी जि प सदस्य हंसराज पाटील बोरगावकरमाजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, दत्ता वाले, केशवराव मुकदम, बाबाराव पाटील गवते, साहेबराव काळे, पंचशील कांबळे, मारोती पाटील बोरगावकर, उद्धवराव पाटील सूर्यवंशी, खशाल पाटील पांगरीकर, हरिभाऊ चव्हाण, भास्करराव पवार, वीरभद्र राजुरे, अविनाश पाटील सूर्यवंशी, भानुदास पाटील पवार व, बी.डी.जाधव, दिनेश तेललवार,प्रभाकर टाले सरपंच रघुनाथराव सोनवळे, चेअरमन डी.एस.सोनवळे, बाबुराव सोनवळे, चेअरमन रमेश केरबाराव सोनवळे, उपसरपंच श्रीराम राऊत, प्रशांत सोनवळे, माजी ईश्वरराव राऊत, रंगराव जोंधळे, विरभद्र राजुरे बी.डी.जाधव, ,भानूदास पाटील पवार, आदींची उपस्थिती होते.

आ. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, देऊळगाव -बेरळी हा रस्ता होण्यासाठी पुम्हा मलाच आमदार व्हावे लागले.आज त्या रत्याच्या कामाची सुरुवात झाली असे सांगूनधोंडे प्रकल्पाचे काम।पाच वर्षात पूर्ण करू जेणेकरून या भागाला सिंचनाची सोय होईल.

रस्ते आरोग्य शिक्षण सिचन या कामाना प्राधान्य असेल अंतेश्वर बंधाऱ्यातून एक थेंब पाणी अन्यत्र जाऊ देणार नाही असे सांगून जातीवाद खूप झाल्याचे निवडणूक काळात अनुभवले आपण कधीच जातिवाद केला नाही. आणि करणार नाही सगळ्याच जाती धर्माचे लोक माझ्या अडीअडचणीत सुख दुःखात येतात पुन्हा जि.प.,पं.स.च्या निवडणुकीत तुमच्याकडे मतदानासाठी येयाचे आहे.
मला सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान केले..
पुढेही तुमच्या सर्वांचे सहकार्य पाहिजेत विकास कामे होतील निधी कमी पडणार नाही असे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले यावेळी माणिकराव मुकदम हंसराज पाटील तसेच मान्यवरांची भाषणे झाली. सुत्रसंचलन बी.डी. जाधव यांनी केले. तर आभार भानुदास पाटील पवार यांनी मानले.
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सरपंच अनेकांचा प्रवेश
देऊळगाव चे सरपंच मारोतराव सोनवळे यांच्यासह अनेकांनी आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस ,मध्ये प्रवेश केलाकेरबा सोनवळे,प्रमोद सोनवळे,माधव साहेब, शिवानंद सोनवळे, बालाजी राऊत, रमाकांत सोनवळे, प्रभाकर राऊत,जयंत सोनवळे, श्रीनिवास सोनवळे,कामाजी सोनवळे, भाऊराव राऊत आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.