नवीन नांदेड। सिडको हडको परिसराला पिण्याच्या पाणी पुरवठा करण्यात येणारी मुख्य लाईन गेल्या आठ दिवसापूर्वी रस्ता खोदताना फुटल्याने सिडको हडको परिसराला होणारा पाणी पुरवठा बंद झाला अखेर पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांना ताटकळत रहावे लागले अखेर आठव्या दिवशी लोकप्रतिनिधी यांनी या बाबत केलेल्या तक्रारी दखल टॅकर व्दारे काही भागात तर नऊ दिवसानंतर काही भागात तुरळक प्रमाणात पाणी पुरवठा झाला आहे, पाणी पुरवठा विभागातील दोन अधिकारी यांच्यी बदली झाल्याने नव्याने आलेले अधिकारी हे पाणी पुरवठा विभागाकडे आली नसल्याने व माहिती नसल्याने नागरीकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळत रहावे लागले आहे.
विष्णुपूरी जलाशयातून नांदेड वाघाळा महागरपालीका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सिडको हडको हडको परिसरात करण्यात येणारी पिण्याच्या पाईप लाईन रस्ता खोदत असल्याने फुटल्या गेल्याने तब्बल आठ दिवसापासून परिसरात पिण्याचे पाणी साठी नागरीकांना ताटकळत रहावे लागले, अखेर पिण्याचा पाण्याचा पाईप लाईन ७ जुलैला सायंकाळी दुरूस्ती झाल्यानंतर काही भागात तुरळक प्रमाणात पिण्याचे पाणी आले.
पंरतु माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे,माजी लोक प्रतिनिधी सौ.इंदुबाई शिवाजी पाटील घोगरे, सौ.वैजयंती भिमराव गायकवाड नगरसेवक प्रतिनिधी संजय पाटील घोगरे, भि.ना.
गायकवाड यांनी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, संबंधित विभाग अभियंता यांना भम्रघ्वनी वरून पाणी नसल्याने नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे सांगितले तर अनेक ठिकाणी मनपा प्रशासन हातपंप बंद असल्याने परिसरातील अनेक महिला सह,युवक नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे सांगितले, प्रशासनाने आठव्या दिवशी म्हणजे ७ जुलै रोजी दोन ते तिन टॅकर सहाय्याने वेगवेगळ्या भागांत पाणी पुरवठा केला.
पाणी पुरवठा विभागातील दोन अधिकारी यांच्यी गेल्या आठ दिवसापूर्वी बदली झाल्याने व नव्याने आलेले अधिकारी यांना या परिसरातील माहिती नसल्याने संबधित अधिकारी सिडको हडको परिसरात न आल्याने पाणी टंचाई यासह अनेक भागातील माहिती नसल्याने या ठिकाणी पूर्वीच्या अधिकारी नियुक्ती करावी अशी मागणी माजी नगरसेविका सौ.वैजयंती गायकवाड यांनी निवेदनाद्वारे आयुक्त मनपा यांच्या कडे केली आहे.