हिमायतनगर। आदिलाबाद नांदेड इंटरसिटी रेल्वे गेल्या अनेक महिन्यांपासून वेळेवर धावत नाही. कधी कधी तर अचानक बंद असल्याचे रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगून मोकळे होतात, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक पेअवॉशन ऐन वेळी पुढे जायचं असल्याने अडथळे निर्माण होत असून, या प्रकारामुळे प्रवाशी वर्गातुन रेल्वेच्या ढिसाळ नियोजन बाबत नाराजी व्यक्त केली जाते आहे. एव्हढंच नाहीतर अचानक नांदेड रेल्वे डिव्हिजनच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी भेट देऊन आढावा घेतला, यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देतांना आता रेल्वे वेळेवर सुरु असल्याचे सांगितले त्यानंतर दोन वेळा आदीलाबाद नांदेड रेल्वे उशिरा धावत असल्याने रद्द झाली हे विशेष.
नादेड रेल्वेच्या डिआरएम निती सरकार यांनी २२ जून रोजी हिमायतनगर रेल्वे स्थानकाला अचानक भेट देऊन येथील कामकाज व प्रवाशांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. रेल्वे मार्गावर भेट देऊन पाहणी केल्यानंतर हिमायतनगरसह किनवट येथील रेल्वे प्रेमी नागरिक व पत्रकारांनी कृष्णा एक्स्प्रेस ही रेल्वे अवेळी येत असल्याने आदीलाबाद – नांदेड इंटरसिटी रेल्वे वारंवार रद्द होत आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठया अडचणीला सामोरे जावे लागले, तसेच येथील स्थानकाचे रखडलेल्या कामाला का पुर्ण केले जात नाही याबाबत प्रश्न विचारला. आता कृष्णा एक्स्प्रेस रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे धावेल याकडे विषेश लक्ष देऊ असे डीआरएम निता सरकार यांनी आश्वासन दिले होते.
रेल्वे विभागाच्या या कारभाराकडे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी विशेष लक्ष देऊन प्रवाश्यांची होणारी हेळसांड थांबवावी आणि हिमायतनगर रेल्वे स्थानकावरून अन्य गाड्या धावण्यासाठी आणि धनबाद एक्स्प्रेस गाडीला थांबा मिळवून देण्यास्तही प्रयत्न करावे अशी मागणी केली जात आहे.
त्यां येऊन गेल्यावर आठवडा उलटला नसताना १ जुलै रोजी सदर रेल्वे उशिरा धावत असल्यामुळे आदिलाबाद नांदेड इंटरसिटी रेल्वे बंद होती. त्यामुळे सकाळपासून दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवाशांना रेल्वे स्थानकावर ताटकळत बसावे लागले. आदिलाबाद नांदेड या रेल्वे मार्गावर तिरुपतीहुन आदिलाबादला येणारी कृष्णा एक्स्प्रेस रेल्वे पुन्हा आदिलाबादहून नांदेडला इंटरसिटी रेल्वे म्हणून दुपारी १२ वाजता नांदेडला पोहचते. नादेडहुन दुपारी ३ वाजता परत आदिलाबादकडे परतीसाठी रवाना होते. सकाळी येऊन दुपारी या रेल्वेने जाणाऱ्यांची संख्या भरमसाठ असुन, देखील गेल्या अनेक महिन्यांपासून सदर रेल्वे आठवड्यातुन एखाद्या वेळी वेळेवर धावली तर प्रवासी आश्चर्य व्यक्त करतात.
महिन्यातुन दोन-तिन वेळा तरी तिरुपतीहुन उशीरा आली की, इंटरसिटी रेल्वे अचानकच बंद राहत असल्याने प्रवाशांना रेल्वेस्थानकावर गेल्यावर समजते. हिमायतनर रेल्वे स्थानकावर सकाळी ९.४० आलेले प्रवाशी नाईलास्तव दुपारी ३ वाजता येणाऱ्या बलारशा मुबई सीएसटी नंदिग्राम रेल्वेने प्रवास करतात. नंदिग्राम रेल्वेला पहिलेच गर्दी असते, ही रेल्वे रद्द झाली त्या दिवशी १ जुलै २०२४ सारखे प्रवाशांना नांदेडपर्यंत उभे राहून प्रवास करावा लागतो. इंटरसिटी रेल्वेला जाणाऱ्या प्रवाशांत रुग्णांची मोठी संख्या असते. अनेकांनी नांदेड हिमायतनगर रेल्वेच्या पासेस काढलेल्या आहेत. तर काही विद्यार्थी शिक्षणासाठी रेल्वेने जातात मात्र अचानक रेल्वे रद्द झाल्यावर प्रवाशांचे बेहाल होत आहेत, त्यामुळे रेल्वे विभागाने दुसरी एखादी रेव्ले या वेळेत सोडून प्रवाशांची होणारी कुचंबणा थांबवावी अशी मागणी केली जात आहे.