नांदेड। शिक्षिका मंगला जमगे यांना सेवापुर्तीनिमित्त समारंभपूर्वक निरोप विद्यार्थ्यांच्या शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या . मंगला जमगे ह्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने गुजराती शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित सेवापुर्ती समारंभात त्यांचा यथोचित सन्मान, सत्कार करुन निरोप देण्यात आला.
शहरातील गुजराती शिक्षण संस्थेत . मंगला जमगे या सन 1992 मध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून रुजू झाल्या होत्या.सेवेची 33 वर्ष पूर्ण करुन त्या नुकत्याच नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याची माहिती प्रेमला साकोळकर यांनी सांगितले.
यानिमित्त गुजराती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष केतन नागडा, उपाध्यक्ष चंद्रकांत पटेल, शंभुलाल मंगे, सचिव दिपक दामा, सदस्य मुकेश पटेल, राकेश शाहा, दिपेश शाहा, भावेश नागडा, अतुल लोटीया, योगेश पटेल, लक्ष्मीकांत गणात्रा, किर्तीभाई छेडा यांनी समारंभपूर्वक त्यांना निरोप दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिकचे मुख्याध्यापक दुर्गादास सापडगावकर यांनी केले. तर सूत्रसंचालन रुकसाना दुर्राणी यांनी केले आभार प्रदर्शन माधुरी पाटील यांनी केले.