किनवट, परमेश्वर पेशवे। आदिवासी पाड्यातील डोंगर दरीत असलेल्या हुडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम राबविला. औचित्य होते वाढदिवसाचे, त्यानिमित्ताने चिमुकल्यांना शालेय साहित्य वाटप केले.
डोंगरदरीच्या कुशीत वसलेल्या हूडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मध्ये मुख्याध्यापक पदी कार्यरत असलेल्या बालाजी हिंगोलै यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाला वाव मिळावा व त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी व त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इयत्ता पहिली ते चौथीच्या लहान बालकांमध्ये शालेय शैक्षणिक साहित्य व वही पेन वाटप करून एक आगळावेगळा वाढदिवस साजरा केला. व या शाळेत शिकणाऱ्या चाळीस विद्यार्थ्यांची मनोबल वाढवण्याचे काम त्यांनी या माध्यमातून केले.
वाढदिवस संपल्यानंतर लागलीच या विद्यार्थ्यांना अल्पोउपहार व गोड पदार्थाची वाटप करण्यात आली. या शिक्षकांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला असल्याचे याप्रसंगी पाहावयास मिळाले . या कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी हिंगोले सहशिक्षक साखरे सहशिक्षक शफी व गावातील सामाजिक कार्यकर्ते निर्गुण पाटील हूडीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.