नांदेड| नांदेड जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या 335 चा होमगार्ड सदस्य अनुशेष भरण्यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन 16 ऑगस्ट 2024 पासून पोलीस मुख्यालय नांदेड येथे केले आहे.


यासाठी 14 ऑगस्ट 2024 अखेर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. होमगार्ड नोंदणीचे माहिती पत्रक नियम व अटीबाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


या अनुशेषामध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक होमगार्ड नांदेड यांना राहील. तरी होमगार्ड मध्ये सेवा करु इच्छिणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील रहीवासी उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.




