हिमायतनगर/नांदेड,अनिल मादसवार। आम्हाला नुकतेच समजले आहे की, अल्पावधीतच नांदेड जिल्ह्यातील गोरक्षक आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने गायींच्या तस्करीचे आणि कत्तलीचे सुमारे १७५ गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. तेलंगणा, आंध्र, कर्नाटक राज्यांमध्ये गोहत्या बंदी नाही. त्यामुळे भारताच्या काही भागातुन विदर्भातील यवतमाळ, हिंगोली जिल्ह्यातुन नांदेड मार्गे तेलंगणा राज्यात तस्करी होत आहे. महाराष्ट्रातील जनतेचे कर्तव्य आहे की, त्यांनी एकत्र येऊन गो तस्करी थांबवावी आणि सरकारने घोषित केलेल्या राज्यमाता व गोसंवर्धनाच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा आणि संपुर्ण राज्य गोहत्या पापापासुन पुर्णपणे मुक्त व्हावे असे विचार श्री राजेंद्रदासजी महाराज यांनी व्यक्त केले.


ते हदगाव हिमायतनगर तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथील शिव महापुरान कथेच्या वेळी बोलत होते, एक वर्षापुर्वीच नांदेड जिल्हामध्ये, कसायांनी एका अतिशय प्रामाणीक गोभक्ताची, गोरक्षकाची, जेव्हा तो गायीचे रक्षण करण्यासाठी मैदानावर ऊतरला होता, तेव्हा भ्याड हल्ला करून हत्या केली आहे. या गोभक्ताने गायीसाठी आपले जीवन अर्पण केले आहे, ही खुप दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे. गोहत्या थांबवणे हे केवळ राज्यकर्त्याचे किंवा केवळ नागरिकांचे कर्तव्य नाही, सरकार आणि नागरीक दोघांनीही गोहत्या बंदी करण्याच्या या पवित्र कार्यात एकत्रितपणे सहभागी झाले पाहिजे.

आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, मुघलांकडुन भयंकर जुलूम केला जात होता, भारताच्या भुमीवर हल्ला झाला होता, संस्कृतीवर हल्ला झाला होता आणि वेद आणि इतर धर्मग्रंथ जाळले जात होते. त्या युद्धाच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बालपणी एका गोहत्या करणाऱ्या कसायाचा सार्वजनिक रित्या शिरच्छेद केला होता. आणि कसायाच्या हातातुन गाय वाचवली होती. आणि त्यांनी विजापुरच्या महाराजांच्या दरबारात उत्तर दिले. फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याने हे होणार नाही, फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याने हे गोष्ट होणार नाही, फक्त छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेतल्याने हे गोष्ट होणार नाही. गोरक्षणासाठीचा त्यांचा संकल्प, या पिता-पुत्रांचे प्रयत्न, गोरक्षणा प्रतीची त्यांची वचनबद्धता या गोष्टी तेव्हा यशस्वी होतील.

आम्ही भगवान शंकर आणि दत्तत्रयाकडे कामना करतो की, लवकरात लवकर, कमीत कमी दिवसांत संपुर्ण भारत देश, अखंड भारत भुमी गोहत्येच्या कलंकातुन सदैव मुक्त होवो, अशी प्रार्थना करतो, असे मत पिंपळगाव येथील शिवमहापुरान कथे दरम्यान मुलुकपिठाधिश्वर श्री राजेंद्रदासजी महाराज यांनी काल केले आहे.
