श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| श्री श्री परमहंस परिवर्जकाचार्य १००८ महंत मधुसुदनजी भारती महाराज दत्त शिखर माहूरगड यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री संत प्रज्ञाचक्षु बालयोगी भगवान गिरीजी महाराज गुरू कैलास गिरीजी महाराज दत्त संस्थान आष्टी व बरडशेवाळा यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२२ फेब्रु.ते २ मार्च २०२५ या कालावधीत श्री.दत्त प्रभुच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक व नैसर्गिक वैभवप्राप्त असलेल्या विष्णु कवि मठ मातृतीर्थ रोड माहूरगड येथे सप्ताहाचे आयोजन केले आहे.तरी भाविक भक्तांनी या अखंड दत्तनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा,असे आवाहान करण्यात आले आहे.


जोपर्यंत पशुवृत्तीतुन आपण मानवतावादी होत नाही.जोपर्यतं मानवतावादी जीवातुन आपण आत्मसाधक होऊन तत्वमार्गक्रमण करत नाही आणि जोपर्यत आपण दत्तसाधक होऊन दत्ततत्वदास्यभक्ती करत नाही तोपर्यत आपला उद्धार या जगात अथवा या ब्रम्हांडात कोणीही करु शकणार नाही.या उदात्त हेतूने माहूर तालुक्यातील तथा पंचक्रोशितील भाविक भक्तांच्या जिवाच्या उध्दारासाठी श्री दत्त प्रभुच्या पावण भूमिवर या अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या दत्त नाम सप्ताहात विविध अध्यात्मिक कार्यक्रमात दि.२२ फेब्रु.रोजी पहिल्या दिवसी पाहटे अखंड दत्त नाम पाहरा,३ ते ६ भुपाळी नामस्मरण, ६ ते ७ प्रवचन व लगेच सकाळचे भोजन सका.१० ते १२ पोथी,दुपारी २ ते ५ प्रवचण,साय. ५ ते ६ आनंद पाठ,त्यानंतर ६ ते ९ दररोज महापुजा राहिल त्यानंतर भोजनाला सुरुवात होईल व सप्ताह समाप्ती दि.०१/०३/२०२५ रोज शनिवारी महाप्रसाद व सायंकाळी महापूजा रात्रभर राहिल व दि. २/०३/२०२५ रोज रविवार सकाळी ६.०० वा. काकडा आरतीने सांगता होईल.अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित केले आहे.तरी पंचक्रोशित सर्व भाविक भक्तांनी या आखंड दत्त नाम सप्ताहाचा अवश्य लाभ घ्यावा.असे आवाहान करण्यात आले आहे.
