नांदेड| नांदेड येथील सुप्रसिद्ध गायिका मेघा संजीवन यांची निर्मिती असलेल्या ‘ तेरे सूर और मेरे गीत’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 16 फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कुसुम सभागृहात करण्यात आले आहे अशी माहिती या कार्यक्रमाचे संयोजक इंजि. संजीवन गायकवाड यांनी दिली आहे.


या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वर सम्राज्ञी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार डॉ अजित गोपछडे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, नांदेड उत्तरचे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर, नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, माजी मंत्री डी पी सावंत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास पत्रकार शंतनु डोईफोडे, पत्रकार गोवर्धन बियाणी, पत्रकार अनिल कसबे, इंजि. माधवराव एकलारे( गणेश एंटरप्रायझेस ), इंजि. श्यामसुंदर कदम ( संभाजी फाउंडेशन, नांदेड),संदीप मैंद ( माय हाॅलीडेज), डॉ. सिध्दार्थ जोंधळे, में विठ्ठल सावजी (सावजी रियल इस्टेट कन्सल्टंट), प्रभाकर टाक धानोरकर (बालाजी ज्वेलर्स,श्रीनगर नांदेड) यांची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका मेघा संजीवन, देश विदेशात सन्मानित झालेले मुंबईचे सुप्रसिद्ध गायक के. शिरीष, गिरीश डोईफोडे , अतुल कौठकर, डॉ हंसराज वैद्य, पत्रकार गायक केशव घोणसे पाटील, इंजिनीयर जयचंद तत्तापुरे, रमेश नागुलवार हे लतादीदींचे गीते सादर करणार आहेत.या कार्यक्रमाचे संगीत संयोजन मनोज गुरव , अमर वानखेडे, शेख नईम, रतन चित्ते, किशोर आवटे सिद्धोधन कदम, स्वप्निल धुळे, राहुल जमदाडे हे करणार आहेत. तसेच मनोज गुरव हे बासरी वादन व मुरलीधर हंबर्डे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या संगीत कार्यक्रमाला नांदेड शहरातील सांस्कृतिक प्रेमी नागरिकांनी व महिला व युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती संयोजन समितीने केली आहे.
