नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत जिल्हास्तरीय सायकलिंग शालेय क्रीडा स्पर्धा दि.११ आगस्ट २४ रोजी असर्जन रोड, विष्णुपुरी येथे पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये गोदावरी पब्लिक स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली त्यात १४ – वर्षाखालील वयोगटामध्ये प्रथमेश सूर्यवंशी हा नांदेड जिल्ह्यात प्रथम आला आहे. तर १७ – वर्षाखालील वयोगटामध्ये गायत्री टिमके ही द्वितीय आली आहे. त्याचबरोबर या स्पर्धेत वेद रंगारी ,तुलसी जोशी ,गौरव मठपती, स्नेहा वडगावकर, या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ.शशिकला बिरादार,सचिव संभाजी बिरादार, प्राचार्य गोविंद तोरणे, क्रीडा शिक्षक डॉ. अभिजीत खेडकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.