सर्व प्रथम मी माझ्या आईला वंदन, प्रणाम करते आपल्या सर्वांचा प्रथम गुरु आपली आई मी माझ्या कावेरी मातेला प्रणाम करते जिले मला हात धरूण अ’ ‘आ’ ‘ई’ लिहायला शिकवले ‘शुभं करोती कल्याणम’ हि प्रार्थना तिनेच आम्हा भावंडाना शिकवले. अशा माझ्या जीवनातल्य प्रथम गुरुस बारंबार प्रणाम ‘आ’ म्हणजे आत्मा ‘ई’ म्हणजे ईश्वर अशी ही आई….. ‘गु’ या शब्दाचा अर्थ अंधकार ‘र’ या शब्दाचा अर्थ प्रकाश, तेज अंधकाराकडुन प्रकाशाकडे जे घेवून जातात. ते गुरु संत कबीरदास गुरु बददल म्हणतात….
“सारी धरती को में कागज बनाऊ”
” सात समुद्र की में शाहि बनाऊ”
मन को में लेखनी बनाऊ”
फिर भी में इतनी महिमा न लिख सकु
असे असतात गुरु,,,, साधारण माणसाचे जीवन तेजोमय जीवन फक्त आपले गुरुच बनवू शकतात. गुरु म्हणजेच माऊली, माता, आई. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु.. ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे गुरु अशा गुरुना आपण बारंबार प्रणाम करूयात चिखलातुन मुर्ती घडवणारा गुरु दगडातुन शिल्प तयार करणारा गुरु…. कोळशातून सोने निर्माण करणारी खान म्हणजे गुरू… अश्या गुरुना मी बारंबार प्रणाय करते.
विश्वास, वात्सल्य वासल्याचा महान वटवृक्ष ज्ञानाची खान, प्रेमाचा अमृत वर्षाव म्हणजे गुरु…अशा महान गुरुला कोटि कोटि प्रणाम जीवनाचा अति सुंदर पथ कि जीये फक्त आनंदाची फुलेच विखुरलेली असतात भक्तीचा सुगंध सर्वत्र विखुरलेला असतो अशा गुरुना शतकोटि प्रनाम गुरु म्हनजे मायेची मखमली चादर कि जिथे निरंतर ज्ञानाचा अमृता वर्षाव निरंतर होत असतो अशा गुरुना बारंबार वंदन. याच अमृत वर्षावाने साधारण दुःखी, पिडीत मानवाचे जीवन सुखमय, आनंदमय होत असते.
जो मानव करितो सन्मान गुरूंचा
त्याला या जगी मिळतो मान:
गुरुकृपे विन न होई कोणी महान
न मोक्ष न मुक्ती गुरुविना काहि न मिळे
या जगती मिळाला ज्यास गुरूंचा आर्शिवाद
तो धन्य आणि अमर झाला
या जगती अश्या गुरुना मी बारंबार
शतकोटि प्रणाम, वंदन करते
आणि हे स्तुती सुमने त्यांच्या
पवित्र कमल चरणावर अर्पण करते.
॥ जय जय सद्गुरू देवा ।।
।। जय जय सदगुरू देवा ।।
…लेखिका …..वर्षा जमदाडे, नांदेड.