नांदेड| भैंसा राज्य तेलंगाणाच्या पोलिसांनी महाराष्ट्रातील पोलिसांच्या मदतीने रेशनच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्या धर्माबाद येथील एका दुकानावर छापा मारला. यात ११० तांदुळाची पोती ज्यात अंदाजे ३५०० किलो तांदुळ किंमती १ लक्ष ५ हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे.


तेलंगाणा राज्य निर्मलचे पोलीस अधिक्षक यांनी समन्वय साधुन भैसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रंमाक ४४/२०२५ कलम ३१८ (४) भा. न्या. संहिता सहकलम ७ ई.सी. अॅक्ट मधील आरोपीचा शोध घेण्यासाठी व मुद्देमाल जप्त करण्यासाठी आपल्या ताफ्यासह धर्माबाद येथे दाखल झाले होते. तेलंगाणा राज्यातील भैंसा शहराचे ASP अविनाश कुमार व निर्मलचे ASP राजेश मीना, मुधोळ पोलीस ठाण्याचे सि.आय. मल्लेश, बासर पोलीस ठाण्याचे एस.आय. गणेश हे आपल्या पथकासह धर्माबाद शहरात दाखल झाले.

यावेळी नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी संपते यांच्या मार्गदर्शनाखाली धर्माबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोकडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालेराव, पोलीस काँटेबल सुपारे दोन्ही राज्याचे पोलीस पथकाने धर्माबाद येथील छत्रपती चौकात असलेल्या गरीब नवाज या तांदुळाचे दुकानावर संयुक्तरित्या छापा मारला. येथे एकूण ११० तांदुळाची पोती (अंदाजे ३५०० किलो तांदुळ) काही बिल बुक व कागदपत्रांसह आरोपी शेख अजिम शेख रहिम यास ताब्यात घेतले. हि छापा कार्यवाही ही तेलंगाणा पोलीस व धर्माबाद पोलीसांनी संयुक्तरित्या पार पाडली.

हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड (IPS), डॉ. जानकी शमिला पोलीस अधिक्षक, निर्मल राज्य तेलंगाणा (IPS), खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, प्रशांत पा. संपते, उपविभागीय पोलीस अधिकारी, धर्माबाद, अविनाश कुमार, ASP भैंसा शहर (IPS), राजेश मीना, ASP निर्मल शहर (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब रोकडे, पोलीस निरीक्षक पो.स्टे. धर्माबाद, बालाजी गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक पो.स्टे. धर्माबाद श्रीमती प्रियंका पवार, पोउपनि पो.स्टे. धर्माबाद, प्रकाश भालेराव सपोउपनि धर्माबाद, विठ्ठल सुपारे पोकों. धर्माबाद, किरण मोरे, चापोकॉ यांनी केली आहे.
