किनवट, परमेश्वर पेशवे l दिनांक 12 रोजी इस्लापूर शहरामध्ये हनुमान जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ह भ प चिन्मय महाराज सातारकर यांचे भव्य प्रवचन झाले.


त्या त्यामध्ये श्री हनुमान मंदिरात अभिषेक सोहळा संपन्न होऊन बाल स्वयंसेवकाच्या वतीने रामायणावर नाटिका सादर करण्यात आली व शेकडो महिलांनी पुरुषाने सामूहिक हनुमान चालीसाचे पठण केले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले . त्यातच आज सायंकाळी सौ. ह. भ. प. भगवती सातारकर यांच्या मधुर वाणीतून भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.


दिनांक 13 रोजी सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य कलश नगर प्रदक्षिणा व रॅलीचे आयोजन करण्यात आले असून रात्री आठ ते दहा ह भ प सुरेश महाराज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रम ठेवण्यात आला असून दिनांक 14 रोजी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी व आया बहिणींनी सकाळी 9 ते 11 वाजता श्री हनुमान मंदिर कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थिती दर्शवावी अशा स्वरूपाचे आव्हान समस्त गावकरी मंडळी इस्लापूर यांच्या वतीने करण्यात आले.

या कलशार्रोहण सोहळ्याच्या निमित्ताने दिनांक 14 रोजी वारकरी भूषण ह भ प अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या मधुर वाणीतून काल्याचा किर्तन सोहळा व महाप्रसादाचा मुख्य आयोजन याच दिवशी करण्यात आलेला आहे.

याप्रसंगी किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम, ह भ प माधव महाराज बोरगडीकर ह भ प बाबुराव महाराज आंबेगावकर ह भ प पंजाब महाराज चालगणी कर ह भ प ज्ञानेश्वर महाराज बोरगडीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे. या कलशारोहण सोहळ्यास माहेरघरच्या सुवासिनी लेकी या हजारोच्या संख्येने सहभागी होऊन आपली उपस्थिती दर्शविणार आहेत. तेव्हा या कार्यक्रमाची शोभा मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाढवावी अशा स्वरूपाचे आव्हान हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.