नविन नांदेड| आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी भाविक भक्त हे विठुरायाच्या दर्शने साठी पंढरपूर ला रवाना झाले असून, विठुराया आणि आषाढीचे महत्व शहरासह ग्रामीण भागतील शाळांमध्ये म्हणजे हाडको येथिल संतोष कन्या प्राथमिक शाळा येथे दि १६ जुलै रोजी वर्ग दूसरी तील विद्यार्थी समर्थ अनिलराव धमने हे विठ्ठलाच्या वेशभूषेत तर स्वरा गणेशराव ढगे ही रुक्मीनीच्या वेशभूषेत व इतर विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत संतोष कन्या प्राथमिक शाळा ते हडको येथिल विठ्ठल रुक्मिणी मंदीर हडको कडे पायी दिंडी काढून परिसरातील सर्व महिला नागरीकांचे लक्ष वेधून घेतले होते.
तर शाळेच्या पटांगणत ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दींडी सोहळा साजरा करण्यात आला. यामध्ये जवळपास शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. यासोहळ्याची सुरुवात टाळ मृंदांगाच्या गजरात भजनाने झाली. यामध्ये पायी दिंडी मध्ये विठ्ठल ‘रुक्मीनीच्या मागे विद्यार्थीनीने तुळशीचे वृक्ष डोक्यावर घेऊन होते. तर वारकरी वेशभूषेत विद्यार्थी यांनी टाळ घेत चंद्रभागेच्या तिरी पाऊले चालली विठुनामाची शाळा भरली.
या सारखे गीत गायन भजने विद्यार्थी यांनी सादर करीत शाळेपासून पायी दिंडी विठ्ठल रुक्मीणी मंदीर हाडको येथे जाऊन विठ्ठलाचे व रुक्मीनी चे दर्शन घेतले ,या पायी दिंडी सोहळ्याचे रस्त्यावरील अनेकांनी स्तुती केली. तर विद्यार्थी व शाळे तील शिक्षकवृंद यांचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वीते साठी मुख्याध्यापक गणेश ढगे ,इश्वर धुळगंडे,अश्विनि आवळे ,संजिव सिद्धापूरे, वर्षा देशमुख, रेखा दिंडे रंजना शेळके परिश्रम घेतले.