नांदेड। येथील तरोडा खुर्द भागातील सुदर्शन नगर येथील नागरिकांनी आमदार बालाजीराव कल्याणकर यांचे त्यांनी त्यांच्या विशेष निधीतून प्रभागात केलेल्या विविध विकास कामांसाठी व नागरी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल संबंधित नगरातील व प्रभागातील नागरिकांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानत आमदार कल्याणकर यांचा सत्कार करण्यात आला.
याविषयी अधिक माहिती अशी की आमदार श्री बालाजीराव कल्याणकर यांनी सुदर्शन नगरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर विषयाचा विचार करून कॉलनीतील ओपन स्पेस मध्ये एक बोर तातडीने मारून द्यायचा निर्णय घेतला. व तसेच एल.टी. पोल विषय अन्वय येणाऱ्या (जिल्हा नियोजन समिती) मधून निधी मंजूर करण्याचे संबंधित विभागास आदेश देण्यासाठी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
यासाठी नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी उपस्थित सुदर्शन नगर येथील रहिवासी प्रकाश मामुलवार, हनुमंत रावणपल्ले, पांचाळ, विनोद मामुलवार, विजय रामदिनवार, श्याम जोशी, शेषराव गायकवाड, प्रवीण रत्नपारखे, गजानन बयनवाड, लक्षटे, लक्ष्मण सिनरोड,कृष्णा चौधरी, अभिजीत पाठक, संगमेश्वर देवशेटवार , श्याम देमेवार,करण चव्हाण यांची उपस्थिती होती.